सतेज पाटील आलम् ट्टी प्रश्‍न

सतेज पाटील आलम् ट्टी प्रश्‍न

Published on

विधिमंडळातून .. लोगो
...


आलमट्टीतून एक लाख क्यूसेक विसर्ग करा

आमदार सतेज पाटील; पूर नियंत्रणासाठी दोन्ही राज्यांमधील मंत्रीस्तरीय बैठक घ्यावी

कोल्हापूर, ता. २६ : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर, सांगली परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये, यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याची मंत्रीस्तरीय बैठक तातडीने घेवून आलमट्टीतील पाण्याचा विसर्ग एक लाख क्युसेकपर्यंत वाढवण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी विधान परिषदेतील कॉँग्रसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली.
कोल्हापूर-सांगली परिसरातील संभाव्य पूरस्थितीबाबत आमदार सतेज पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. परिणामी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुराची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. आलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून उपाय योजना करण्यासाठी यापूर्वी दरवर्षी दोन्ही राज्यांच्या मंत्री समितीची बैठक घेण्यात येत होती. महापुरावर २०२१ व २०२२ मध्येही दोन्ही राज्यातील मंत्रीस्तरावरील बैठका झाल्या होत्या. मात्र यावर्षी ही बैठक झालेली नसून ती तातडीने घ्यावी. महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या आलमट्टी धरणातील विसर्ग एक लाख क्युसेक्सपर्यंत वाढवण्याच्या सूचना कराव्यात. आलमट्टीतील पाण्याची उंची ५१६.७४ पर्यंत गेली असुन ती १५ ऑगस्टपर्यंत ५१७ वर स्थिर ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारशी बोलावे.’
---
चौकट
सरकारकडून गांभीर्याने दखल

यावर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘आमदार पाटील यांनी पूरग्रस्त जनतेच्या दृष्टिकोनातून गंभीर प्रश्‍न मांडला आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली आहे.’
...
कर्नाटक सरकार पत्र पाठवणार
कोल्हापूर आणि सांगली पुरासंदर्भात आलमट्टी धरणातील पाण्याचा फुगवटा खूप महत्वाचा आहे. आलमट्टी धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी गेली दोन वर्षे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहिला आहे. तसाच समन्वय यावर्षीही सुरू आहे. या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पत्र पाठवणार असल्याचे, आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
---
कोट
‘आलमट्टीबाबत सतेज पाटील यांनी मांडलेल्या प्रश्‍नावर दोन्ही राज्यांच्या मंत्री समितीची बैठक घेवून तोडगा काढला जाईल. आमदार पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या मुद्यांबाबत संबंधित मंत्र्यांना माहिती दिली जाईल. त्यानुसार तेथे चर्चा करुन पाणी सोडण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.