संभाव्य पूरस्थितीमुळे १ लाख विद्यार्थ्यांना सुटी

संभाव्य पूरस्थितीमुळे १ लाख विद्यार्थ्यांना सुटी

Published on

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील २९८ शाळा बंद


संभाव्य पूरस्थितीमुळे १ लाख विद्यार्थ्यांना सुटीः परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत वर्ग भरणार नाहीत

कोल्हापूर, ता. २६ ः शहरातील संभाव्य पूरस्थिती विचारात घेवून कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण २९८ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांतील १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांना आजपासून सुटी मिळाली आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तसेच प्रशासनाकडून पुढील आदेश होईपर्यंत या विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार नाहीत.
याबाबत शहरातील मुख्याध्यापक, प्राचार्यांना शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबाबतची सूचना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी परिपत्रकाद्वारे केली आहे. शहरातील कसबा बावडा, भोसलेवाडी, बापटकॅम्प, राजीव गांधी वसाहत आदी परिसरातील शाळांना पुराचा धोका आहे. ते लक्षात घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने या शाळांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने पूरबाधित २७ गावांमधील शाळांना आज आणि उद्या, गुरूवारी सुटी देण्याचे आदेश मंगळवारी दिले. त्यानुसार शाळा बंद राहिल्या. पूरस्थिती लक्षात घेवून काही शाळा सुरू राहिल्या. काही खासगी शाळांनी वर्ग भरण्याची वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला. शहरात महानगरपालिकेच्या ५९ शाळा आहेत. त्यांच्यासह अन्य २३९ शाळांना आजपासून सुटी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी दिली.
...

विद्यार्थी शाळेत आल्यानंतर प्रशासनाचा आदेश

जिल्हा प्रशासनाने मंगळवारी केवळ पूरबाधित २७ गावांतील शाळांना सुटी जाहीर केली होती. त्यामुळे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा आज नियमित वेळेप्रमाणे भरल्या. विद्यार्थी शाळेत आले. त्यानंतर संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर या शाळांना सुटी देण्याचा आदेश प्रशासनाने काढला. त्यामुळे शाळा, पालकांची धावपळ झाली. शहरातील शाळांबाबतही मंगळवारी सायंकाळी प्रशासनाने सुटी जाहीर केली असती, तर ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अधिक बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.