सिलंबम म्हणजे काय?

सिलंबम म्हणजे काय?

Published on

13212
‘सिलंबम’ खेळाकडे विद्यार्थ्यांचा वाढला कल
शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश ः शिवकालीन युद्धकलेशी साधर्म्य असल्याने आकर्षण

कोल्हापूर, ता. २९ : शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट असलेल्या ‘सिलंबम’ क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांचा आकडा वाढत आहे. शिवकालीन युद्धकलेशी साधर्म्य असल्याने हा खेळ चर्चेचा ठरला आहे. एकूण पाच प्रकारांचा सिलंबममध्ये समावेश असून, चौदा, सतरा व एकोणीस वयोगटात खेळला जातो.
सिलंबम हा मूळचा तामिळनाडूतील युद्धकला प्रकार आहे. त्याचा दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश झाला. त्या वेळी सिलंबम या शब्दामुळेच तो नेमका खेळ कोणता आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना नव्हती. विशेष म्हणजे तो शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी कोल्हापुरातील मर्दानी आखाड्यातील खेळाडू थेट तामिळनाडूमध्ये जाऊन बक्षीस मिळवून आले होते. कोल्हापूर सिलंबम असोसिएशनच्या माध्यमातून ठिकठिकाणी खेळाची प्रात्यक्षिके दाखवून खेळ रूजविण्याचे प्रयत्न झाले.
त्याचा परिणाम म्हणून आता चौदा वर्षाखालील गटात १२०, सतरा वर्षाखालील गटात १००, तर एकोणीस वर्षाखालील गटात सुमारे ५० खेळाडू सहभागी होत आहेत. त्यातून राष्ट्रीय पातळीवर प्रत्येक गटातून प्रत्येकी सहा खेळाडूंची निवड केली जाते. विशेष म्हणजे शहर परिसरात शिवकालीन आखाड्यांतील खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या सिलंबमकडे कल वाढत असल्याचे दिसत आहे.

चौकट
सिलंबममधील प्रकार असे :
-एकेरी लाठी
-दुहाती लाठी
-तलवार फेक
-भाला फेक
-लाठी लढत

चौकट
असा खेळतात खेळ
लाठी लढत प्रकारात दहा बाय दहाच्या वर्तुळात दोन प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे राहतात. लाठीच्या साह्याने ते एकमेकांच्या शरीराला स्पर्श करून गुण मिळवतात. वर्तुळाबाहेर गेल्यास स्पर्धकाचे गुण कमी होतात. लाठीचा जोरदार प्रहार होऊन शरीरास दुखापत होऊ नये, यासाठी हाताला हँग्लोज व डोक्याला हेल्मेट वापरले जाते.

कोट
सिलंबमचा अद्याप पाच टक्के नोकरीच्या आरक्षणात समावेश झालेला नाही. खेळाकडे खेळाडूंचा आकडा मात्र वाढत आहे. आम्ही खेळाचा प्रसार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे.
- शिवराज सुनगार, सदस्य, कोल्हापूर सिलंबम असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com