न्यायासाठी जनतेच्या दबावाची गरज; मीरा बोरवणकर

न्यायासाठी जनतेच्या दबावाची गरज; मीरा बोरवणकर

Published on

19888
गडहिंग्लज : रवळनाथ हौसिंग सोसायटीतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. मीरा बोरवणकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर रेखा पोतदार, उमा तोरगल्ली, एम. एल. चौगुले, मीना रिंगणे, डी. के. मायदेव उपस्थित होते.

न्यायासाठी जनतेच्या दबावाची गरज
मीरा बोरवणकर : गडहिंग्लजला रवळनाथ सोसायटीतर्फे कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : भारतीय कायदे चांगले आहेत. पण, त्यांची परिणामकारक अंमलबजावणी होत नाही. सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचार व राजकीय हस्तक्षेपामुळे व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे पिडितांना न्याय मिळण्यासाठी जनतेच्या दबावाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी पोलिस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर यांनी केले.
येथील रवळनाथ हौसिंग सोसायटीतर्फे महिलांसाठी कार्यक्रम झाला. याप्रसंगी डॉ. बोरवणकर बोलत होत्या. रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. लायन्स ब्लड बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
डॉ. बोरवणकर म्हणाल्या, ‘‘सोशल मिडियामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोशल मिडीयाच्या दुष्परिणामाबाबत आपल्या पाल्यांना वेळीच सजग करा. तसेच त्याच्या सदुपयोगांचीही माहिती सांगा.’’ चौगुले यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
संचालिका रेखा पोतदार यांनी स्वागत केले. सीईओ डी. के. मायदेव यांनी प्रास्ताविक केले. दीपाली पट्टणशेट्टी, सविता वडगुले, उज्ज्वला मार्तंड, प्रज्ञा पाटील, संपदा घुगरे, मंजुनाथ गुरव यांचा विशेष सत्कार झाला. राष्ट्रीय सहकारी संघातर्फे घेतलेल्या व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्रांचे वितरण झाले. राजश्री कोले यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका उमा तोरगल्ली यांनी आभार मानले.
-------------
चौकट...
महिलांना पाठबळ द्या...
डॉ. बोरवणकर म्हणाल्या, ‘‘अडचणीच्या काळात महिलांना नोकरी सोडावी लागू नये म्हणून कुटुंबातील सर्वांनी पाठबळ द्यावे. कुटुंबीयांच्या पाठबळामुळेच आपली कारकिर्द यशस्वी झाली आहे. सोशल मिडीयाचा चांगल्यासाठी वापर करुन हरवलेला संवाद सुरु ठेवूया. त्यासाठी मलाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com