महाद्वार रोड

महाद्वार रोड

आवश्यक दुरुस्ती केलेल्यांना
व्यवसायास अडथळा नको
ठाणेकर; धोकादायक इमारतींबाबत पत्रक
कोल्हापूर, ता. ३१ ः ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, स्टॅबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेकडे सादर केले आहे. तसेच इमारतींची आवश्यक दुरुस्ती करून घेतली आहे. त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास महापालिकेने अडथळा करू नये. अन्यथा व्यावसायिकांच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा भाजपचे प्रवक्ते अजित ठाणेकर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे, अतिवृष्टीत धोकादायक इमारतीमुळे जीवित, वित्त हानी होईल असे सांगून महाद्वार रोडवरील ४५ व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्यास भाग पाडले आहे. ही दहशत पसरवण्यामागे नेमका हेतू काय? धोकादायक इमारतींना नोटीस बजावल्या. त्यातील मोजक्या वगळता इतरांनी एकतर स्ट्रक्चरल ऑडिट किंवा स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर केले आहे. महानगरपालिकेने सुचवल्याप्रमाणे दुरुस्तीही करून घेतल्या आहेत. काहींनी धोकादायक गॅलरी, भिंती उतरून घेतल्या आहेत. तरीही वारंवार नोटीस लागू केल्या जात असल्याने नागरिक, व्यावसायिक त्रस्त आहेत. नोटीसांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक व्यावसायिकांची उपजीविका त्यांच्या व्यवसायावर अवलंबून आहे. दुकाने बंद ठेवल्यामुळे हाल होत आहेत. त्याच परिसरामध्ये शेकडो अवैध यात्री निवास असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. प्रशासनातील काही अधिकारी आणि काही आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या स्वार्थापोटी तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली ही मूळ बाजारपेठ, जुनी वस्तीचा परिसर मोकळा करण्याचा मानस अनेक वेळा उघड झाला आहे. त्यातूनच ही दहशत पसरविण्याचा खेळ काही वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com