महसूल सप्ताह

महसूल सप्ताह

युवा संवादसह विविध कार्यक्रम
महसूल सप्ताहात ः जिल्हाधिकारी रेखावार
कोल्हापूर, ता. ३१ : जिल्ह्यातील महसूल विभागाकडून उद्यापासून (ता. १) सोमवारपर्यंत (ता. ७) महसूल सप्ताह होणार आहे. सप्ताहात युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, कार्यरत, निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘१ ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रम होतात. महाराजस्व अभियानात विभागनिहाय उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येईल. बुधवारी (ता. २) ‘युवा संवाद’ उपक्रम होईल. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध संस्थांमध्ये प्रवेशासाठी अर्जदारांनी दाखल केलेले प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात येतील. ९ वी व ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना १० वी व १२ वीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व इतर क्षेत्रांत संस्थेत प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे माहितीपत्रक प्रसिध्द करुन त्याचे शाळा, महाविद्यालयांत वाटप होईल. गुरुवारी (ता. ३) ‘एक हात मदतीचा’ उपक्रमात खरिपातील पिकांचे विमा उतरविण्यासाठी मागणीनूसार पीक पेरा अहवाल, सात-बारा व ८ अ असे तलाठी स्तरावरुन दिले जाणारे दाखले दिले जातील. शुक्रवारी (ता. ४) जनसंवाद उपक्रमात जमिनीविषयक आवश्यक नोंदी अद्यावत करुन तलाठी मंडल अधिकाऱ्यामार्फत अर्ज निकाली काढतील. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील तक्रारी निकाली काढल्या जातील. शनिवारी (ता. ५) ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रम होईल. रविवारी (ता. ६) ‘संवर्गातील कार्यरत निवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद’ व सोमवारी (ता. ७) महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com