पेन्शनरांचे धरणे आंदोलन

पेन्शनरांचे धरणे आंदोलन

20223
कोल्हापूर : ‘बीएसएनएल’च्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी पेन्शनच्या रिव्हीजनसाठी धरणे आंदोलन केले.

‘बीएसएनएल’ निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन
कोल्हापूर, ता. ३१ : ‘बीएसएनएल’च्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी पेन्शनच्या रिव्हीजनसाठी आज देशातील जिल्हा आणि राज्यस्तरावर बीएसएनएल कार्यालये आणि दूरसंचार लेखानियंत्रक कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले. शहरासह गडहिंग्लज, इचलकरंजी, जयसिंगपूर आदी ठिकाणी बीएसएनएल आंदोलन झाले.
दरम्यान, सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. मागणी मान्य न झाल्यास केंद्र सरकारच्या विरोधात २१ ते २५ ऑगस्ट कालावधीत जंतर-मंतर, नवी दिल्ली याठिकाणी पाच दिवशीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे.
आंदोलनाचे नेतृत्व ‘एसएनपीडब्लूए’चे जिल्हा सचिव तानाजी गंधवाले, जिल्हा अध्यक्ष मकरंद अभ्यंकर, अमृत देसाई, एस. डी. मुरगी, ‘एआयसीजीपीए’चे दक्षिण महाराष्ट्र सचिव सुहास सोनाळकर, जिल्हा सचिव शिवाजी तोंदले, अध्यक्ष मंगेश मंगेशकर, किरण देशपांडे यांच्यासह सुमारे ५०० वरनिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये निवृत्त महिलांचा विशेष सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com