महिलेला धमकावून लुबाडणाऱ्या तरुणाला अटक

महिलेला धमकावून लुबाडणाऱ्या तरुणाला अटक

(फोटो - २०१९९)
...
महिलेला धमकावून लुबाडणाऱ्या तरुणाला अटक

लुटलेला ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

कोल्हापूर, ता. ३१ ः ‘तू मला भेटायला का आली नाहीस? तू मला भेटलीच पाहिजेस, नाही तर तुझ्या नवऱ्याला मारणार’, अशी धमकी देऊन महिलेला दगडाने जखमी करून लुबाडण्याचा प्रकार रविवारी संध्याकाळी हुतात्मा पार्क येथे घडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज सापळा रचून या गुन्ह्यातील संशयित आरोपी धीरज रामचंद्र आयवळे-पाटील (वय १९, सध्या रा. कणेरी, ता.करवीर. मूळ रा. करंबळी, ता. गडहिंग्लज) याला कागल येथून अटक केली. त्याच्याकडून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिलेल्या माहितीनुसार, धीरजने एका विवाहित महिलेला फोन करून हुतात्मा पार्क येथे भेटायला येण्यास सांगितले. तू आली नाहीस, तर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेणार असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे ही महिला त्याला भेटण्यासाठी हुतात्मा पार्कमध्ये आली. ‘माझे लग्न झाले आहे, मला फोन करून का त्रास देतोस, परत मला फोन करू नकोस,’ असे त्या महिलेने ठणकावून सांगितले. यावळी धीरजने तिला ‘तू मला भेटलीच पाहिजेस, नाही तर मी तुझ्या नवऱ्याला मारीन, अशी धमकी दिली. तसेच तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र, कानातील रिंग, मोबाईल असा ऐवज काढून घेतला. तिच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे देण्यात आला.
पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर धीरजची माहिती काढली. आज धीरज कागल येथील स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी येथे सापळा रचून धीरजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह सुमारे ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सहाय्यक फौजदार सुनील कवळेकर, हवालदार अशोक पोवार, युवराज पाटील, सागर चौगले, यशवंत कुंभार यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com