पथनाट्य

पथनाट्य

20075

‘नवे शिक्षण नवा विचार’वर
‘सायबर’तर्फे पथनाट्य

कोल्हापूर, ता. ३१ : भवानी मंडपात बारा विद्यार्थी जमा झाले. हातात डफ घेऊन ‘वासुदेव आला हो वासुदेव आला,’चा गजर सुरू झाला. अन्य विद्यार्थी वर्तुळ करून बसले आणि शैक्षणिक समस्यांचा पाढा एका विद्यार्थ्याने वाचण्यास सुरुवात केली. वाद-संवाद सुरू झाल्यावर नव्या शैक्षणिक धोरणातून शिक्षणाची संधी किती सोपी झाली आहे, याचा उलगडा होत गेला. ‘सकाळ’च्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त सायबरच्या सामाजिक कार्य विभागातर्फे ‘नवे शिक्षण नवा विचार’ विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.
तरुणाईतील नेतृत्त्व घडविण्यासाठी ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) उपक्रम घेतले जातात. ‘सकाळ’ तरुणाईला घडविण्यासाठी पुढाकार घेत असताना आपणही ‘सकाळ’च्या वर्धापन दिनाला काहीतरी वेगळे करायला हवे, या भावनेने सायबरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करण्याचे ठरवले.
त्यासाठी ते सकाळी अकराच्या सुमारास भवानी मंडपात जमले. शिवानंद पोळ याने पथनाट्याची सुरुवात केल्यानंतर शैक्षणिक गाऱ्हाणे मांडले गेले. त्यावर नव्या शैक्षणिक धोरणातून शिक्षण घेणे किती सोपे झाले आहे, यावर प्रकाश टाकला. त्यांच्यातील संवादाने उपस्थितांचे लक्ष वेधले. करवीरनिवासिनी अंबाबाई व तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची पावले थबकली. वैभव मुऱ्हेकर, दीपक मोरे, ज्ञानेश्‍वर इंगळे, प्रसाद मानकर, अंजली वड्ड, अक्षय साठे, पूजा दलवाई, वैष्णवी पवार, आकाश पाटील, भगवान सूर्यवंशी, रितेश कांबळे यांचा पथनाट्यात सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com