

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण आत्मघातकी हल्ला झाला.
कोल्हापूर : ‘पुलवामा-बालाकोट काही तथ्यं आणि काही प्रश्न’ यावर सोमवारी (ता. २१) शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान होणार आहे. कोल्हापुरातील विविध विवेकी संघटनांनी एकत्र येऊन ‘लोकजागर’ नावाचे संघटन स्थापन केले आहे. ‘लोकजागर’तर्फे हे जाहीर व्याख्यान, चर्चासत्र होईल.
जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक ऑनलाईन सहभागी होणार आहेत. लेखक, संशोधक फिरोज मिठीबोरवाला, निवृत्त लेफ्टनंट कर्नल सी. जे. रानडे उपस्थित राहून मांडणी करणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० जवान घटनास्थळावर शहीद झाले होते. भारताने २६ फेब्रुवारी २०१९ ला बदला घेणारा बालाकोट हवाई हल्ला केला.
पुलवामा आत्मघातकी हल्ला झालाच कसा आणि बदला घेणारा एयर स्ट्राईकचे नेमके वास्तव काय, याबाबत हे व्याख्यान आयोजित केले आहे. पत्रकार परिषदेला संजय पाटील, जीवन बोडके, प्रमोद पुंगावकर, सुधीर हंजे, महेश जाधव, राजूभाई मालेकर, सीमा पाटील, अमरदिप कुंडले आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.