‘शरद पॅटर्न’मध्ये शिक्षणासोबत संस्कारही

‘शरद पॅटर्न’मध्ये शिक्षणासोबत संस्कारही

24867
यड्राव : येथे शरद पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा अनिल बागणे यांनी सत्कार केला.

‘शरद पॅटर्न’मध्ये शिक्षणासोबत संस्कारही
अनिल बागणे : प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत, गुणवंतांचा सत्कार
दानोळी, ता. २१ ः ‘शरद पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कारही दिले जातात, म्हणूनच तो सगळीकडे अनुकरणीय झाला आहे. विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घेताना महाविद्यालयात दिले जाणारे कौशल्य आत्मसात करायला हवे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शरद पॉलिटेक्निकमध्ये विविध कौशल्ये व आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येते,’ असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी केले.
ते यड्राव येथील शरद पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभात बोलत होते.
श्री. बागणे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासोबत औद्योगिकपूरक कौशल्य आत्मसात करावे. अभ्यासक्रमाबरोबर प्रत्येक सत्रामध्ये नवीन कौशल्य शिकावे. अद्ययावत कौशल्याचा उपयोग स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी, चांगल्या कंपनीत नोकरी व जीवनात यशस्वी बनण्यासाठी होणार आहे. या सर्वामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळणार आहे.’
महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. ताशिलदार यांनी महाविद्यालय व विभागाची माहिती दिली. यावेळी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. एन. एस. पोतदार यांनी स्वागत केले. प्रा. सौ. डी. व्ही. लोहार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. टी. एस. खुरपे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com