पीएन. रणशिंग

पीएन. रणशिंग

फोटो
...

पी. एन. यांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

सदभावना दौडचे निमित्त ः नेटक्या नियोजनामुळे कार्यकर्त्यांत उत्साह

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने काढलेल्या सदभावना दौडच्या निमित्ताने काँग्रेसचे करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांनी काल (ता. २१) विधानसभेचे रणशिंगच फुंकले. गेली ३० वर्षे हा त्यांचा उपक्रम सुरू आहे, त्यातून काँग्रेस आणि दिवंगत राजीव गांधी यांच्याविषयी त्यांची असलेली निष्ठाच दिसत आहे.
दरम्यान, नेटक्या नियोजनामुळे आणि राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीने ही सदभावा दौड गाजली. यानिमित्ताने करवीरमधील कार्यकर्त्यांचा उत्साहही दुणावला आहे.
काँग्रेस आणि काँग्रेसचाच विचार पुढे घेऊन जाणाऱ्या राज्यातील काही मोजक्या नेत्यांत पी. एन.पाटील यांचा समावेश आहे. राजीव गांधी यांची १९९१ ला हत्या झाली. त्यानंतर पहिल्या जयंतीपासून पी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने ही सदभावना दौड सुरू झाली. काँग्रेस नेत्याच्या स्मरणार्थ राज्यात नव्हे तर देशात सलग ३० वर्षे हा एकच उपक्रम सुरू आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. यावर्षीही त्याच उदंड प्रतिसादात काढलेल्या या दौडच्या माध्यमातून श्री. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
दसरा चौकातील शाहू बोर्डींगमध्ये या दौडची सुरूवात तर दिवंगत राजीव गांधी यांच्याच नांवे पी. एन. यांनी सुरू केलेल्या दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील राजीवजी सुतगिरणीत त्याची सांगता आणि त्यानंतर शेतकरी मेळावा असे या दौडचे स्वरूप राहीले आहे. शेतकरी मेळाव्याची जागा पूर्वीच्या सांगरूळ विधानसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघातून ते एकदा आमदार झाले. २००९ मध्ये मतदारसंघांच्या पुर्नरचनेत या मतदारसंघाचे अस्तित्व संपुष्टात आले आणि त्यांनी करवीरमधून लढण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये ते करवीरमधून आमदार झाले. पण सदभावना दौडची सुरूवात आणि त्याची सांगता ही ठरलेल्या ठिकाणीच त्यांनी ठेवली.
करवीरसह जिल्ह्यातील पी. एन. यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावाच या निमित्ताने भरतो. त्यात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेसला मानणाऱ्या वक्त्यांना बोलवून काँग्रेस आणि त्या पक्षाचे राष्ट्रासाठीचे योगदान, विचार सर्वांपर्यंत पोहचवण्याचे एक व्यासपीठ अशीही या सदभावना दौडची ओळख झाली आहे. यावर्षी काँग्रेसचे युवा कार्यकर्ता कन्हैयाकुमार यांना बोलवून पी. एन. यांनी ही दौड राष्ट्रीय पातळीवर तर नेलीच पण विधानसभेची पायाभरणीही या निमित्ताने केली.
...

गांधी कुटुंबियांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न

पी. एन. पाटील यांच्या पुढाकारानेच कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दिवंगत राजीव गांधी यांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. गेली ३० वर्षे सुरू असलेल्या सदभावना दौडसाठीही गांधी कुटुंबियातील एखाद्या व्यक्तीने उपस्थित रहावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com