आरक्षित जागेत पोष्ट कार्यालय बांधा

आरक्षित जागेत पोष्ट कार्यालय बांधा

gad218.jpg
24903
गडहिंग्लज : आरक्षित जागेत पोस्ट कार्यालय बांधण्याच्या मागणीचे निवेदन आजी-माजी सैनिक असोसिएशनने पोस्ट मास्तर दीपक कोळी यांना दिले.
---------------------------------------------------
आरक्षित जागेत पोस्ट कार्यालय बांधा
गडहिंग्लजला आजी-माजी सैनिक असोसिएशनतर्फे मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : शहरातील मुख्य पोस्ट कार्यालय बागी कॉम्प्लेक्समधून वडरगे रोडवरील बीएसएनएल कार्यालयात स्थलांतरित झाले आहे. हा पत्ता शोधणे ग्रामीण लोकांना अडचणीचे ठरत आहे. संकेश्‍वर रोडवर पोस्टासाठी आरक्षित केलेल्या जागेत कार्यालयाची इमारत बांधावी, अशी मागणी आजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन व जय जवान जय किसान फाउंडेशनने केली आहे.
याबाबत पोस्ट मास्तर दीपक कोळी यांना संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील, सचिव रामकृष्ण शेंडे, भीमगोंडा पाटील, सुबराव पाटील, बसाप्पा आरबोळे, जयवंत नांगरे, राजू उत्तुरे आदींनी निवेदन दिले. वडरगे रोडवर गेलेल्या पोस्ट कार्यालयाचा पत्ता बऱ्याच जणांना सापडत नाही. वास्तविक अनेक वर्षांपासून पोस्ट कार्यालयासाठी संकेश्‍वर रोडवर जागा आरक्षित केली आहे. मुळात पोस्टाच्या अनेक योजना आहेत. त्याच्या लाभासाठी नागरिकांचे कार्यालयात येणे अधिक आहे, परंतु कार्यालय स्थलांतरित झाल्याने गैरसोयीचे ठरत आहे. नागरिकांना याचा त्रास होत आहे. स्वमालकीच्या जागेत कार्यालय उभारल्यास पोस्टाचे भाडे वाचेल. कायमस्वरूपी हक्काचे कार्यालय होईल. यामुळे लवकर या कार्यालयाच्या बांधकामासाठी मंजुरी द्यावी. श्री. कोळी यांनी आरक्षित जागेत कार्यालय बांधकामाचा प्रस्ताव दिला असून, संघटनेची ही मागणी तातडीने वरिष्ठांपर्यंत कळवण्याची ग्वाही दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com