अवास्तव तरतुदींचा अभ्यास करावा

अवास्तव तरतुदींचा अभ्यास करावा

GAD219.JPG
24913
गडहिंग्लज : नदीतील गाळ उपसासंदर्भात भारतीय किसान संघाच्या शिष्टमंडळाने आमदार राजेश पाटील यांना सोमवारी निवेदन दिले.
-----------------------------------------------------
अवास्तव तरतुदींचा अभ्यास करावा
नदीतील गाळ उपसा धोरण : भारतीय किसान संघाने वेधले आमदारांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : शासनाने नदीतील गाळ उपसा करण्याच्या धोरणाचा अध्यादेश काढला आहे. परंतु यामधील तरतुदी अवास्तव व अपुऱ्‍या आहेत. त्यांचा सखोल अभ्यास करुन हिरण्यकेशी नदीच्या महापुराचे संकट दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याकडे भारतीय किसान संघाने आमदार राजेश पाटील यांचे आज लक्ष वेधले.
शासकीय विश्रामगृहात या प्रश्‍नावर संघाच्या शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले. पावसाळ्यात हिरण्यकेशी नदीला पूर येत आहे. चार दिवस जोरदार पाऊस झाला तरी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून पिकांसह घरांचे व पशुंचे मोठे नुकसान होत आहे. नदीकाठावरील गावांचे जनजीवनच संकटात येत आहे. यासाठी जबाबदार असलेला नदीतील गाळ काढण्याची आवश्यकता आहे. परंतु शासनाने जाहीर केलेल्या धोरणातील तरतुदी अवास्तव आहेत. शासन व संबंधित जलसंपदा विभागातर्फे या तरतुदींचा सखोल अभ्यास करुन महापुराचे संकट दूर करण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. यासाठी आमदार व जिल्हाधिकाऱ्‍यांच्या उपस्थितीत जलसंपदाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा घडवून आणावी. आवश्यक ते मदतकार्य आणि शाश्‍वत धोरण ठरवण्यासाठी भारतीय किसान संघ सर्वतोपरी सहकार्य करेल. राम पाटील, बसवराज हंजी, बाळगोंडा पाटील, अशोक देशपांडे, अमरनाथ घुगरी, आण्णासाहेब नेवडे, काशिनाथ मोर्ती, सदानंद सुभेदार, गुरुराज हत्ती, प्रकाश देसाई, शिवाजी चौगुले, सत्यजित मोळदी, उमाशंकर मोहिते यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
---------------
महामार्गासाठीचे संपादन कायदेशीर हवी
दरम्यान, संकेश्‍वर-आंबोली महामार्गासाठी आवश्यक शेती, वहिवाट क्षेत्राचे संपादन करण्यासाठी संबंधित शेतकरी, वहिवाटधारकांना वैयक्तिक सूचनापत्र कायदेशीर मार्गाने द्याव्यात आणि कायदेशीर संपादन प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी. तोडलेल्या वृक्षांच्या बदलत्या झाडांची पुनर्लागवड व्हावी. रामतीर्थजवळील राणी व्हीक्टोरिया पूल प्राचीन वस्तू म्हणून जतन करण्याची मागणीही दुसऱ्‍या एका निवेदनातून किसान संघाने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com