शिवाजी सहकारी बँकेच्या 
मालमत्ता लिलाव स्थगित

शिवाजी सहकारी बँकेच्या मालमत्ता लिलाव स्थगित

शिवाजी सहकारी बँकेच्या
मालमत्ता लिलाव स्थगित
हरळीची शाखा व खुली जागा; माजी संचालक, सभासदांच्या प्रयत्नांना यश
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : येथील अवसायानात गेलेल्या शिवाजी सहकारी बँकेच्या हरळी बुद्रुकमधील शाखा इमारत व खुल्या जागेचा जाहीर लिलाव स्थगित करण्यात आला. संचालकांसह सभासदांची मागणी आणि अवसायकांच्या सुचनेनुसार जाहीर लिलावाची ही प्रक्रिया थांबवण्यात येत असल्याचे लेखी पत्र सरव्यवस्थापक रवींद्र भोसले यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
शिवाजी बँक काही वर्षापूर्वी अवसायानात काढली आहे. अवसायक म्हणून शाहूवाडीचे उपनिबंधक व्ही. जी. जाधव काम पाहत आहेत. चंदगड राज्यमार्गावरील हरळी बुद्रुक हद्दीत बँकेची १२.४९ आर इतकी खुली जागा असून त्यावर १०६.१३ चौ. मी. ची शाखा इमारत आहे. अवसायकांनी या मालमत्तेचा जाहीर लिलाव काढला होता. दरम्यान, बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण, माजी संचालक किरण कदम, दिलीप माने, प्रमोद रणनवरे, पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, चंद्रकांत सावंत, माजी उपनगराध्यक्ष नितीन देसाई, उदय कदम, संजय मोकाशी, हिंदुराव नौकूडकर यांनी हा अन्यायकारक जाहीर लिलाव रद्द करण्याची मागणी सहकार मंत्री अतूल सावे यांच्याकडे केली. कोणत्याही प्रकारच्या देणींबाबत ठेवीदारांसह कोणाकडूनही मोठ्या प्रमाणात तगादा नाही. कर्ज वसूलीचे प्रमाणही ठेवींच्या मागणीपेक्षा जास्त आहे. असे असताना प्रशासक व अधिकाऱ्यांनी संगनमताने बँकेची मालमत्ता विकण्याचा घाट घातला असून यामुळे बँकेचे नुकसान होणार आहे. म्हणून या लिलाव प्रक्रियेला स्थगिती द्यावी, असे साकडे निवेदनाद्वारे घातले होते.
दरम्यान, लिलावासाठी निविदा भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाने या निवेदनाच्या अनुषंगाने आज अवसायक जाधव यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. त्यांनी सरव्यवस्थापक भोसले यांना दुरध्वनीवरुन सूचना दिल्या. त्यानंतर भोसले यांनी ही लिलाव प्रक्रिया थांबविण्यात येत असल्याचे लेखी पत्र शिष्टमंडळाला दिले. यामुळे लिलाव स्थगितीसाठी माजी संचालक व सभासदांचे सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com