थेट पाईपलाईन

थेट पाईपलाईन

थेट पाईपलाईनचे पाणी
सप्टेंबरअखेरपर्यंत शहरात

आमदार सतेज पाटील ःयोजनेचे काम अंतिम टप्प्यात

कोल्हापूर, ता. २१ ः ‘काळम्मावाडी धरणस्थळावरील उपसा केंद्राच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. उपसा पंपही बसवले आहेत. त्यांची टप्प्याटप्प्यांनी चाचणी घेत सप्टेंबरअखेरपर्यंत थेट पाईपलाईनचे पाणी नियमितपणे शहरात येईल,’ असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन थेट पाईपलाईन योजनेच्या कामाबाबतचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले,‘३३ किलोमीटर अंतराच्या पाईपची चाचणी घेऊन त्या स्वच्छ केल्या आहेत. अर्जुनवाडा येथील व्हॉल्वच्या प्रकारामुळे उर्वरित पाईपसाठी प्रथम व्हॉल्वची तपासणी करून चाचणी घेण्याची सूचना केली आहे. जॅकवेलवरील उपसा केंद्राच्या स्लॅबचे काम झाले आहे. तसेच पंपही बसवले आहेत. त्यामुळे जॅकवेलवरील काम संपले आहे. विद्युत वाहिनीच्या शिल्लक चार किलोमीटरच्या कामांपैकी दोन किलोमीटरचे काम राहिले आहे. दहा दिवसांत तेही पूर्ण होऊन महावितरण त्या वाहिनीची चाचणी घेईल. महावितरणने आणलेले नवीन तंत्रज्ञानही बसवले जाणार आहे. योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून वीजवाहिनी तसेच उर्वरित पाईपलाईनची चाचणी घेऊन २५ सप्टेंबरपर्यंत काळम्मावाडी धरणातील पाणी शहरात येईल. त्यानंतर अखेरपासून नियमित पाणीपुरवठा होईल.’
पुईखडी येथे पाणी आणल्यानंतर तिथून शहरातील विविध भागात पुरवठा करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या पाईपलाईनचा वापर केला जाणार आहे. त्याबाबत आमदार पाटील म्हणाले, ‘अमृत योजनेतून १२ टाकी व अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर आहे. ते ठेकेदाराकडून करून घेण्याचे आव्हान आहे. ठेकेदार कंपनीने दोन महिन्यात ते काम पूर्ण करू असे सांगितले आहे. तोपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या पाईपलाईन, टाक्यांमधूनच पाणी पुरवठा होईल. त्यामुळे जरी थेट पाईपलाईनचे पाणी आले तरी अमृतच्या अपुऱ्या कामाचा फटका बसणार आहे.’ यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com