मेन

मेन

05527
आर. के. नगर ःपरिसराला होणारा दुर्गंधीयुक्त काळा पाणीपुरवठा.

आर. के. नगरात
दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

महिन्यापासूनचे चित्र ः महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

कंदलगाव, ता. २१ : एक दिवस आड पाणीपुरवठा असे सांगणाऱ्या महापालिकेकडून आजपर्यंत नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. त्यात एक महिन्यापासून मूळ सोसायटीतील ७०, सोसायटी नं. १ मधील २० आणि सोसायटी नं. २ मधील ३० अशा नळधारकांना दुर्गंधीयुक्त काळे पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे.
परिसरात व्यावसायिक, नोकरदार असल्याने केवळ यासाठी रोज पाठपुरावा करणे जमत नाही. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. परिसरातील जलवाहिनी पन्नास वर्षांपूर्वीची असल्याने तिची अनेकदा दुरुस्ती झाली आहे; मात्र या जलवाहिनीवरील गळतीतून सांडपाणी मिसळत असल्याचे अजूनही सापडलेले नाही.

कोट
नळाला वारंवार दुर्गंधीयुक्त पाणी येते. आता काळे पाणी येत आहे. परिसरातील एकही नळधारक हे पाणी पिण्यासाठी वापरत नाही. त्यामुळे पिण्यासाठी टँकर घ्यावा लागतो.
-संजय कदम, नागरिक.

कोट
या ठिकाणच्या गळतीत दूषित पाणी मिसळत होते. ही गळती सापडली आहे. दोन दिवसांत गळती काढून स्वच्छ पाणीपुरवठा करू.
-नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com