मतदान नोंदणी

मतदान नोंदणी

जिल्ह्यात मतदार नोंदणीला गती
ंअंतिम यादी २७ ला जाहीर ः ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक

सुनील पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार नोंदणीला गती आली आहे. जिल्ह्यात सध्या १६ लाख १३ हजार ७१५ पुरुष मतदार, १५ लाख ४३ हजार ५३५ महिला, तर १३८ इतर असे एकूण ३१ लाख ५७ हजार ३८८ मतदारांची नोंदणी आहे. जिल्ह्यात महिलांपेक्षा ७० हजार १८० पुरुषांचे जादा मतदान आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मात्र पुरुष मतदारांपेक्षा ९२८ महिलांचे जादा मतदान आहे.
जिल्ह्यात नवमतदार वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. गावोगावी तसेच प्रभागनिहाय अधिकारी नियुक्त करून नोंदणी केली जात आहे. नवमतदारांसोबतच स्थलांतरित, मृत मतदारांचे नाव कमी करणे, दुबार नावे वगळण्याचे काम सुरू आहे. याची अंतिम यादी शुक्रवारी (ता. २७) जाहीर होणार आहे. यामध्ये एखाद्याला आक्षेप असेल किंवा दुरुस्ती असतील तर त्याही दुरुस्त करता येणार आहेत. दरम्यान, नवमतदारांनी मतदार यादीत नावनोंदणी करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासह महाविद्यालयातही मतदार नोंदणीचे शिबिर घेतले जात आहे. दरम्यान, नोंदणी केलेली नाही त्यांनाही मतदार यादीत नोंदणीची अजूनही संधी आहे.

जिल्ह्यात ११पर्यंत नोंद मतदारसंख्या
मतदारसंघ* पुरुष* महिला* इतर* एकूण*
चंदगड* १,५८,५५१* १,५६,४९५* ०६* ३,१५,०५२
राधानगरी* १,७२,४६१* १,६०,०६२ * ०३* ३,३२,५२६
कागल* १,६४,७७२* १,६२,०७०* ०५* ३,२६,८४७
कोल्हापूर दक्षिण* १,७३,१९४* १,६५,३२४* ३२* ३,३८,५५०
करवीर* १,६२,९४५* १,४८,७८६* ०६* ३,११,७३७
कोल्हापूर उत्तर* १,४३,३४८* १,४४,२७६* १६* २,८७,६४०
शाहूवाडी* १,५२,४८८* १,४१,६७५* ०३* २,९४,१६६
हातकणंगले* १,७०,३९४* १,६०,५०४* ०८* ३,३०,९०६
इचलकरंजी* १,५५,०४३* १,४६,४०६* ५९* ३,०१,५०८
शिरोळ* १,६०,५१९* १,५७,९३७* ००* ३,१८,४५६
एकूण* १६,१३,७१५* १५,४३,५३५* १३८* ३१,५७,३८८
-----
कोट
जिल्ह्यातील १८ ते १९ वयोगटांतील नवमतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी. सध्या ऑनलाईनसह व्होटर ॲपद्वारेही मतदार नोंदणी करता येते. त्यामुळे घरबसल्या मतदार नोंदणी करता येत आहे. याचा लाभ घेऊन तरुणांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा.
- समाधान शेंडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com