समाजकल्याणचे ''नमो दलित सन्‍मान अभियान''

समाजकल्याणचे ''नमो दलित सन्‍मान अभियान''

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

समाजकल्याण विभागाचे
‘नमो दलित सन्‍मान’ अभियान

दोन दलित वस्‍त्यांचा होणार कायापालट

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता.१३: नमो ११ सुत्री कार्यक्रमांतर्गत ‘नमो दलित सन्‍मान’ अभियान राबवण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. यात राज्यातील ७३ दलित वस्‍तींचा कायापालट होणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्‍ह्यातून दोन दलित वस्‍तींची निवड केली जाणार आहे. विकासपासून वंचित असणाऱ्या‍ वस्‍तीला या अभियानात समाविष्‍ट करुन घेण्यात येणार आहे.

या अभियानासाठी निवड केल्या जाणाऱ्या‍ दलित वस्‍तीसाठी निकष ठरवण्यात आले आहेत. यामध्ये, ज्या वस्‍त्यांमध्ये रमाई आवास किंवा प्रधानमंत्री आवास योजनेतून पुरेशी पक्‍की घरे देण्यात आलेली नाहीत, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच ज्या वस्‍त्यांमध्ये १०० टक्‍के पक्‍के रस्‍ते नाहीत, पुरेशी वीज उपलब्‍ध नाही, वस्‍तीत समाजमंदिर नाही, ज्या वस्‍तीत महिला बचत गट नाही त्याचबरोबर पायाभूत सुविधा उपलब्‍ध नसलेल्या वस्‍तींचा या अभियानात समावेश केला जाणार आहे.

या अभियानात सहभागी झालेल्या दलित वस्‍तीमधील कुटुंबांना पक्‍की घरे बांधून दिली जाणार आहेत. तसेच १०० टक्‍के पक्‍के रस्‍ते व वीजपुरवठा केला जाणार आहे. समाजप्रबोधनासाठी समाज मंदिरही उभारले जाणार आहे. तसेच दलित महिलांना सामाजिक व आर्थिक सक्षम करण्यासाठी मदत केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com