जिल्हास्तरीय कॅरममध्ये दावणे प्रथम

जिल्हास्तरीय कॅरममध्ये दावणे प्रथम

GAD132.JPG ः
37682
प्राजक्ता दावणे

जिल्हास्तरीय कॅरममध्ये दावणे प्रथम
गडहिंग्लज ः नृसिंहवाडीत झालेल्या जिल्हास्तरीय १९ वर्षाखालील कॅरम स्पर्धेत येथील जागृती हायस्कूलची विद्यार्थिनी प्राजक्ता दावणे हिने प्रथम क्रमांक मिळवला. तिची रत्नागिरीत होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थाध्यक्ष डॉ. सतीश घाळी, संचालक, प्राचार्य विजयकुमार चौगुले, पर्यवेक्षक शिवाजी अनावरे यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक संपत सावंत, बाळासाहेब खरात, प्रकाश हरकारे यांचे मार्गदर्शन मिळाले.
------------------------------------
GAD134.JPG
37683
गडहिंग्लज ः शिवराज महाविद्यालयाच्या उद्यानात डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी दिग्विजय कुराडे, किशोर अदाटे, महेश चौगुले आदी उपस्थित होते.

शिवराज महाविद्यालयात वृक्षारोपण
गडहिंग्लज : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील शिवराज महाविद्यालयाच्या उद्यानात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्याहस्ते हिमालयातील औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, डॉ. महेश चौगले, प्रा. किशोर अदाटे, सुमित चौगूले, हसन मकानदार, उदय राऊत उपस्थित होते.
----------------------------------------------
gad135.jpg ः
37684
रोहीत नांदूलकर

साई इंटरनॅशनलच्या नांदूलकरचे यश
गडहिंग्लज ः जिल्हास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धेत साई इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी रोहीत नांदूलकर याने १९ वर्षाखालील गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, क्रीडा शिक्षक सुभाष तिप्पे, मुख्याध्यापिका दिपाली कोरडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
----------------------------------------------
gad136.jpg
37685
भडगाव ः डॉ. ए. डी. शिंदे पॉलीटेक्नीकमध्ये अमृत कलश पूजनप्रसंगी ए. एस. शेळके, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शिंदे टेक्नॉलॉजीत अमृत कलशाचे पूजन
गडहिंग्लज ः भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मेरी माटी, मेरा देश अभियानातंर्गत अमृत कलशाचे पूजन झाले. प्राचार्य ए. एस. शेळके अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या आवारातून कलशामध्ये माती गोळा केली. त्या कलशात तृणधान्याचे रोपण केले. सर्वांनी पंचप्राण शपथ घेतली. संस्थाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव स्वाती कोरी यांचे मार्गदर्शन मिळाले.
---------------------------------------------
gad137.jpg ः

अमित घुमरे, तुषार लाखे

कुलस्वामीनी मंडळ अध्यक्षपदी घुमरे
गडहिंग्लज ः शहरातील लाखे नगरातील कुलस्वामीनी तालीम मंडळाच्या अध्यक्षपदी अमित घुमरे-पाटील, उपाध्यक्षपदी तुषार लाखे यांची निवड केली. खजिनदारपदी अनिकेत गुंठे, सचिव म्हणून साईप्रसाद लाखे यांची निवड झाली. विलास लाखे, किरण लाखे, राजू लाखे, बाळू लाखे, महेश लाखे आदी उपस्थित होते. नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय झाला.
---------------------------------------
GAD138.JPG ः
37686
अभिजीत कांबळे, आर्यन लाखे

कांबळे अध्यक्षपदी, लाखे उपाध्यक्ष
गडहिंग्लज ः येथील काळभैरी रोडवरील आर. के. कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी अभिजीत पाटील व उपाध्यक्षपदी आर्यन लाखे यांची निवड झाली. सचिवपदी पंकज तोडकर, खजिनदार म्हणून प्रशांत रोटे यांना संधी दिली. संस्थापक रमेश कोरवी अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया झाली. विनायक माने, करण लाखे, रोहीत रेडेकर, विश्वनाथ पाताळे, राकेश कोरवी, सिद्धेश श्रीखंडे, भरत कांबळे, पवन लाखे, अमर कोरवी, सचिन बिलावर आदी उपस्थित होते.
--------------------------------------------
क्रिएटीव्ह विद्यार्थ्यांची कारखान्याला भेट
गडहिंग्लज ः येथील क्रिएटीव्ह हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रभेट उपक्रमातंर्गत बेकरी कारखान्यास भेट दिली. किरण देवार्डे यांनी बेकरीतील कामकाज व तयार होणारे विविध पदार्थाबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती दिली. अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई, सचिव अण्णासाहेब बेळगुद्री, मुख्याध्यापक दिनकर रायकर यांच्या मार्गदर्शनाने वर्गशिक्षिका लक्ष्मी गोंदुकुप्पे, स्नेहा खमलेट्टी यांनी नियोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com