नवरात्रोत्सवात उद्यापासून भक्ती सोहळा

नवरात्रोत्सवात उद्यापासून भक्ती सोहळा

gad139.jpg
37687
गडहिंग्लज ः नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूर्गादेवी प्रतिष्ठापनेसाठी मंडळाचे कार्यकर्ते मंडप उभारणीत व्यस्त आहेत. दुसऱ्या छायाचित्रात घटस्थापनेसाठी मातीचे मडके विक्रीसाठी बाजारात दाखल झाली. (आशपाक किल्लेदार ः सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------------------------------
नवरात्रोत्सवात उद्यापासून भक्ती सोहळा
गडहिंग्लज तालुका ः मंदिर व्यवस्थापन, मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ ः नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून नऊ दिवस भक्ती सोहळ्याची सुरुवात रविवारपासून (ता. १५) होत आहे. या कालावधीत देवीची आराधना आणि देवीच्या भक्तीतून ऊर्जा मिळवण्यासाठी विविध मंदिरांचे व्यवस्थापन आणि तरुण मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्वच्छता आणि रंगरंगोटीने मंदिरे आणि घराघरातील देव्हारे घटस्थापनेसाठी सजवून तयार ठेवले आहेत.
विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नऊ दिवसांत देवीची आराधना करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. मंदिरांसह घरांची स्वच्छता पूर्ण झाली आहे. घरातील अंथरूण-पांघरूण स्वच्छ केली आहेत. काही नागरिकांनी घरांना रंगरंगोटी केली आहे. देव्हाऱ्यांना आकर्षक रंगांनी सजवले आहे. रविवारी घटस्थापना असल्याने घरोघरी आणि मंदिरांमध्ये त्याच्या तयारीने वेग घेतला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. नऊ दिवस धार्मिक वातावरणात हा भक्ती आनंद सोहळा साजरा होणार आहे.
दरम्यान, तालुक्यात ९० तरुण मंडळे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. यामध्ये २० मंडळे शहरातील आहेत. मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणीत व्यस्त आहेत. आगमनाची मिरवणूक काढण्याचे नियोजनही सुरू केले आहे. कुंभारवाड्यात बहुतांशी मूर्ती तयार झाल्या असून, काही मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे. मंडळाचे कार्यकर्ते मूर्तीची निश्चिती आणि स्वागताची तयारी करण्यात मग्न आहेत. आगमन मिरवणुकांसाठी पोलिसांनी विविध नियमांचे बंधन घातले. न्यायालयीन निर्देशानुसार मर्यादेत आवाजात साउंड सिस्टीम लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहिले तीन दिवस रात्री बारापर्यंत, तर उर्वरित दिवशी रात्री दहापर्यंत साउंड सिस्टीम लावण्याची परवानगी दिली आहे. साउंड व्यावसायिक संघटनेने लेझर लाईट न लावण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे कौतुकही होत आहे.
---------------
महालक्ष्मी मंदिरातील सोहळा
दरम्यान, शहरातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवस्थान ट्रस्टतर्फे दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. रविवारी (ता. १५) सकाळी सातला मंदिरात घटस्थापना होणार आहे. हिरण्यकेशी नदीघाटापासून सुवासिनींची कलश मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर मंदिरात ओटी भरणीचा कार्यक्रम होईल. १९ ऑक्टोबरला सुरगीश्वर मठाचे श्री गुरूसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींच्या सान्निध्यात कुंकुमार्चन सोहळा आहे. २० ऑक्टोबरला कोजागरी पोर्णिमेनिमित्त रात्री बारा वाजता देवीस दुग्धाभिषेक व त्यानंतर दुग्धपान होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com