धामणे प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे

धामणे प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे

gad1312.jpg
37708
धामणे ः येथील विद्यामंदिरमध्ये कार्यरत झालेले सीसीटीव्ही कॅमेरे.
--------------------------------------
धामणे प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे
पालकांमधून समाधान ः विद्यार्थ्यांना मिळाले सुरक्षा कवच
सकाळ वृत्तसेवा
उत्तूर ता. १३ : ‘आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीत आहात’ हे वाक्य शासकीय कार्यालये, दुकाने येथे हमखास वाचायला मिळते. हे सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच प्राथमिक शाळांमध्ये पोहोचत आहे. धामणे (ता. आजरा) येथील प्राथमिक विद्यामंदिर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आली आहे. सीसीटीव्हीचे हे सुरक्षा कवच विद्यार्थ्यांना मिळाल्याने पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सीसी.टी.व्ही बसवणारी उत्तूर परिसरातील ही पहिली शाळा आहे.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील एकनाथ सावंत व सदस्यांच्या बैठकीत शाळेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला. यासाठी शाळेचे पालक व नागरिकांना मदतीचे आवाहन केले. नागरिकांनी याला प्रतिसाद देऊन माजी ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष कै. केरबा संतु गिलबिले याच्या स्मरणार्थ त्यांची स्नुषा कमल ईश्वर गिलबिले यांनी स्वखर्चाने सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. याबाबत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या एजन्सीबरोबर संपर्क साधला. सुमारे वीस हजार रुपये खर्च करून चार कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी बसवले. दोन दिवसांपूर्वी यांची चाचणी घेऊन कॅमेरे कार्यरत झाले. यामुळे आता परिसरात सीसीटीव्हीचा वॉच असल्याने एक प्रकारचा धाक राहणार आहे.
----------------------------
सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने शाळा व शालेय परिसराचे होणारे नुकसान व त्रास यापासून सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.
- अंजना आजगेकर,
मुख्याध्यापिका, प्राथमिक विद्या मंदिर, धामणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com