इचल : सुळकूड योजनेसाठी लाक्षणिक उपोषण

इचल : सुळकूड योजनेसाठी लाक्षणिक उपोषण

37802

इचलकरंजी : सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने गांधी चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
...

सुळकूड योजनेसाठी लाक्षणिक उपोषण

योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्याची इचलकरंजीकरांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. १३ : इचलकरंजी शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांना पुरेसे व शुद्ध पाणी मिळण्यासाठी सुळकूड पाणी योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने शुक्रवारी महात्मा गांधी चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी अनेक पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला यांनी भेट देऊन ही योजना पूर्णत्वास नेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर शहर परिसरातील संघटना, संस्था व नागरिकांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असून येथील लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. शहरात उद्योगांचे प्रमाण अधिक असल्याने परराज्य, परजिल्हा, परगावाहून उदरनिर्वाहाकरिता आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी दूधगंगा नदीतून सुळकूड येथून अमृत २ योजनेंतर्गत नळ पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. शासनाने सर्व प्रकारे विचार करून या योजनेस मंजुरी दिली आहे. ही मंजूर पाणी योजना तत्काळ कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे बोलावलेली बैठक पुढे ढकलण्यात आली. या पार्श्वभूमीवर कृती समितीने आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला होता. या अनुषंगाने शुक्रवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली. आंदोलनास खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत ही योजना कार्यान्वीत करण्यासाठी आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यावेळी प्रताप होगाडे, विठ्ठल चोपडे, अलका स्वामी, अजितमामा जाधव, पुंडलिक जाधव, प्रकाश सुतार, शिवाजी साळुंखे, रवी रजपुते, अण्णा कागले, श्रीपाद कुलकर्णी, दत्ता माने, विनय महाजन, सुनील सांगले, राजा कांबळे, विश्वनाथ मुसळे, बजरंग लोणारी आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात शशांक बावचकर, सागर चाळके, मदन कारंडे, रवींद्र माने, सदा मलाबादे, कौशिक मराठे, प्रकाश मोरबाळे, भाऊसाहेब आवळे, सयाजी चव्हाण, अभिजित पटवा, उमाकांत दाभोळे, विकास चौगुले, राहुल सातपुते, जावेद मोमीन, वसंत कोरवी आदींसह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, नागरिक व महिलांनी सहभाग घेतला.
...

विविध संघटनांचा पाठिंबा
इचलकरंजी शहराला सध्या पाणीपुरवठा होणाऱ्या‍ कृष्णा पाणी योजनेस वारंवार लागणाऱ्या‍ गळतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने सुरू केलेल्या आंदोलनास नागरिकांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनास ब्राह्मण सभा, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी, सुन्दर बाग फेरीवाला संघटना आदींसह शहर परिसरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com