सख्या भावाच्याही घरी मारला डल्ला

सख्या भावाच्याही घरी मारला डल्ला

37727
...
सख्ख्या भावाच्या घरी
घरफोडी करणाऱ्याला अटक

चोरटा कागलमधील सेंट्रिंग ठेकेदार ः २२ पैकी १७ तोळ्यांचे दागिने जप्त

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १३ः सख्ख्या भावाच्या घरासह, चार ठिकाणी घरफोडी करून २२ तोळे सोन्यांचे दागिने चोरणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. विठ्ठल सखाराम पाटील (वय ४८, रा. कुरणी, ता. कागल. जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. तो सेंट्रिंग ठेकेदार असून, त्याच्याकडून १७ तोळे सोने जप्त करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून त्याने केलेल्या चोऱ्या शाहूपुरी पोलिसांनी उघडकीस आणल्या. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला उद्या (ता. १४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती निरीक्षक अजय सिंदकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले की, विठ्ठल पाटीलने मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) परिसरातून कविता प्रवीण पाटील (रा. पालकरवाडी पैकी वाळवे, ता. राधानगरी) यांची सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स चोरली होती. त्याचा तपास करताना विठ्ठल पाटीलवर संशय व्यक्त झाला. त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. सप्टेंबरमध्ये त्याने सीबीएसवरील चोरीत ३५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण आणि रोकड असा ऐवज चोरला होता. त्यापैकी १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. अधिक चौकशीत त्याने मुरगूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि राधानगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक चोरी केल्याची माहिती दिली.
कसबा वाळवा (ता. राधानगरी) येथे सख्ख्‍या भावाच्या घरी पाठीमागील दरवाजाची कडीकोयंडा तोडून फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याने चार लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. त्यापैकी पावणेदोन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच पूजा एकनाथ वरुटे (माळवाडी, हमीदवाडा परिसर, कागल) यांच्या घरी २०२० मध्ये चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करून साडेसहा तोळ्यांचे दागिने चोरले. या चोरीतील अडीच लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केले.
सोनाली नामदेव कुऱ्हाडे (रा. कुरणी, ता. कागल, जि. कोल्हापूर) या त्याच्याच गावातील महिलेच्या घरातील साडेचार तोळ्यांचे दागिने विठ्ठल पाटीलने चोरले होते. यातील सुमारे सव्वातीन लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. सहाय्यक फौजदार संदीप जाधव, हवालदार संजय जाधव, मिलिंद बांगर, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ, बाबासाहेब ठाकणे, रवी आंबेकर, विकास चौगुले, महेश पाटील यांनी हा तपास केला.
...

घरात एकट्या महिला पाहून केल्या चोऱ्या

घरात एकट्या महिला पाहून विठ्ठल पाटीलने चोऱ्या केल्या आहेत. २०२० पासून तो घरफोडी, जबरी चोऱ्या करीत आहे. तरीही पोलिसांना सापडला नव्हता. सीबीएसमध्ये प्रवासी महिलेची दागिने असलेल्या पर्सची चोरी केली आणि तो पोलिसांना सापडला. दहावी नापास असलेल्या पाटीलकडून पोलिसांनी सर्वच गुन्हे उघडकीस आणले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com