शेतकरी संघ

शेतकरी संघ

जी. डी. पाटील यांनी २७ लाखांच्या
कामावर ३५ लाख उचलले

सुरेश देसाई : अमरसिंह मानेंमुळे संघाची जागा हकनाक गमावली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : ‘शेतकरी सहकारी संघाच्या शाखा दुरुस्तीची निविदा न काढताच संघाचे माजी अध्यक्ष जी. डी. पाटील यांनी २७ लाख रुपये मंजूर असताना, याच कामाचे ३५ लाख रुपये उचलले आहेत. अमरसिंह माने अध्यक्ष असताना राजारामपुरी येथील संघाची हक्काची जागा गमावली आहे. पाटील आणि माने अध्यक्ष असतानाच ९० कर्मचाऱ्यांची चुकीच्या पध्दतीने भरती करून संघाला महिन्याला २० लाख रुपयाला अधिक खर्चात लोटले असल्याचा आरोप अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई आणि संचालक अजितसिंह मोहिते यांनी केले. यावेळी संचालक जयवंत पाटील, कार्यकारी संचालक सचिन सरनोबत उपस्थित होते.
ते म्हणाले,‘जी. डी. पाटील अध्यक्ष असताना, राजारामपुरी येथील जागा संघाच्या ताब्यात होती. ती त्या मालकाने अचानक काढून घेतलेली नाही. त्या मालकाने संघाला पत्र पाठवून संघाकडे असणारी जागा खाली करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर संगनमत झाले आणि संघाच्या व्यवस्थापकाला तिकडे पाठवण्याचे बंद केले. त्यामुळे संबंधित मालकाने तेथील सर्व साहित्यासह जागा परत घेतली. तरीही, त्याच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल केली नाही. अमरसिंह माने अध्यक्ष असताना लक्ष्मीपुरी येथील संघाची हक्काची जागा गेली. ज्या मालकाविरुध्द दावा होता, त्यांनी संघाला कूळ म्हणून मान्यता दिली होती. त्यामुळे संघाला ही जागा मालकी हक्काने मिळाली होती. ती जागा माने यांनी हकनाक आणि संगनमताने सोडून दिली.’
...

पाटील, माने यांनी भाडेकरू आणावेत
‘अंधेरी येथील प्लॉटला सव्वालाख रुपये भाडे देणारे भाडेकरू आणावेत, आम्ही त्यांनी आणलेल्या भाडेकरुंना ही जागा देऊ आणि संघाचा फायदा केला म्हणून अमरसिंह माने आणि जी. डी. पाटील यांचा सत्कारही करू’, असे आवाहन अध्यक्ष देसाई यांनी केले.
....
‘मॅग्नेट’बाबत तोटा केला म्हणणे चुकीचे
शेतकरी संघाने मॅग्नेटचा करार २००८ मध्ये केला. यावेळी, आनंदराव पाटील-चुयेकर हे अध्यक्ष होते. तर, संचालक म्हणून यशवंत पाटील-टाकवडेकर, जी. डी. पाटील, युवराज पाटील, प्रभातराव माने हे संचालक होते. त्यामुळे हा करार करून आम्ही तोटा केला म्हणणे चुकीचे असल्याचे देसाई यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com