संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा

संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा

37813 व 37814
कोल्हापूर : संतोष चषक फुटबॉल स्पर्धेतील फ गटातील सामन्यांचे उद्‍घाटन शुक्रवारी मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी रितेशकुमार, धनराज मोरे, माणिक मंडलिक, अमर सासणे, नंदकुमार बामणे, नीलराजे बावडेकर, संग्राम यादव, प्रदीप साळोखे, मनोज जाधव आदी. दुसऱ्या छायाचित्रात महाराष्ट्र विरुद्ध अंदमान निकोबार सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)


लोगो - संतोष करंडक फुटबॉल

दणदणीत विजयाने महाराष्ट्राची सलामी
अंदमान-निकोबारवर ८-० अशी मात; निखिल कदमचे दोन, तर संकेतचा एक गोल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : येथे आजपासून सुरू झालेल्या संतोष करंडक फ गटातील स्पर्धेत आज महाराष्ट्राने अंदमान - निकोबारवर ८ विरुद्ध ० अशा गोल फरकाने दणदणीत विजय मिळवला. यात कोल्हापूरच्या निखिल कदमने दोन, तर संकेत साळुंखे याने एक गोल नोंदवला. दुसऱ्या सामन्यात त्रिपुराने आंध्रप्रदेशवर १ विरुद्ध ० अशी मात केली. तेलंगणा आणी लक्षद्वीप यांच्यातील सामना बरोबरीत राहिला. येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सामने होत आहेत.
एआयएफएफ सदस्य अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सकाळी स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. यावेळी सामने प्रमुख रितेश कुमार, स्पर्धा समन्वयक धनराज मोरे, माणिक मंडलिक, अमर सासने, नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, नीलराजे बावडेकर, संग्राम यादव, विश्वंभर मळेकर, प्रदीप साळोखे उपस्थित होते.
पहिल्याच सामन्यात यजमान महाराष्ट्राने अंदमान - निकोबारचा धुव्वा उडवला. एकतर्फी सामन्यात कर्णधार निखिल कदमने १९ व २१ व्या मिनिटाला सलग दोन गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. २७ व्या मिनिटाला हिमांशू पाटीलने, तर जॉन्सन मॅथ्यूने ३० व्या मिनिटाला गोल केला. ४५ व्या मिनिटाला हिमांशू पाटीलने वैयक्तिक दुसरा गोल केला. ५९ व्या मिनिटाला अद्वैत शिंदेने, तर ६७ व्या मिनिटाला ध्रुवेश निजपने व ७८ व्या मिनिटाला संकेत साळोखेने गोल करत महाराष्ट्र संघाची आघाडी ८ विरुद्ध ० गोल होऊन विजय साकारला.
दुसऱ्या सामन्यात त्रिपुरा व आंध्रप्रदेश संघात चुरस पहायला मिळाली. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघाचे बलाबल अनुभवले. पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत गेल्यानंतर उत्तरार्धात दोन्ही संघांनी गोलसाठी प्रयत्न केला. त्रिपुराच्या संजीब शील याने ८६ व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला आघाडीसह विजय मिळवून दिला. दिवसातील तिसरा सामना तेलंगणा विरुद्ध लक्षद्वीप यांच्यात झाला. दोन्ही संघांनी चांगला खेळ करत आक्रमण थोपवले. अखेर सामना गोल शून्य बरोबरीत राहिला.

ता. १५ चे सामने
महाराष्ट्र विरुद्ध लक्षद्वीप - सकाळी साडेआठ
तेलंगणा विरुद्ध आंध्रप्रदेश - सकाळी साडेअकरा
त्रिपुरा विरुद्ध अंदमान - निकोबार दुपारी साडेतीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com