महामार्गबाधीतांना सहकार्य करणार

महामार्गबाधीतांना सहकार्य करणार

ajr131.jpg......
37788
आजरा ः येथील महामार्गच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश आबिटकर. या वेळी उपस्थित वसुंधरा बारवे, समीर माने, सुनिल हारुगडे, ज्योत्स्ना चराटी, आर. बी. शिंदे.
------------------------
महामार्गबाधीतांना सहकार्य करणार
आमदार आबिटकर ः आजऱ्यात संकेश्वर- बांदा महामार्ग प्रश्नी बैठक
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ ः महामार्गबाधीत शेतकरी, आजरा शहरातील दुकानदार, रहिवाशी यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांना सर्वतोपरी मदत देणार आहे. शासनदरबारी त्यांचे प्रश्न मांडून नुकसान भरपाईसाठीही प्रयत्न करू, अशी ग्वाही राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये संकेश्वर- बांदा महामार्ग प्रश्नावर बैठक झाली. आमदार आबिटकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आजरा - भुदरगडच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार समीर माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे, आजरा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता आर. बी. शिंदे, कनिष्ठ अभियंता ए. ए. पाटील आदी उपस्थित होते.
संजय तर्डेकर म्हणाले, २००५ माहीतीच्या अधिकाराखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने माहिती दिली आहे. त्यामध्ये स्पष्ट आहे. आजरा - गडहिंग्लज हा साडेपाच मीटरचा रस्ता आहे. साडेपाच मीटरच्या आत काम करा. रस्त्याचे काम साडे पाच मीटरपेक्षा अधिक आहे. त्याची नुकसान भरपाई द्यावी.’ श्रीमती बारवे म्हणाल्या, ‘हे मुद्दे पुर्वीच्या बैठकीतही उपस्थित झाले आहेत. शासनाच्या मार्गदर्शकानुसार काम प्रशासन करत आहे. तालुक्यातील १३ गावात १६ हेक्टरचे संपादन होणार असून याची नुकसान भरपाई दोन टप्प्यात दिली जाईल.’ शिवाजी गुरव यांनी पाच पटीने नुकसान भरपाईची मागणी केली. सुरेश दोरुगडे, नाथा देसाई, दशराज आजगेकर, अनंत मोरजकर, जयसिंग खोराटे, अमानुल्ला आगलावे, शिवाजी इंगळे यांच्यासह शेतकऱ्यांनी सुचना मांडल्या.
---------
शेतकऱ्यांचा बेमुदत ठिय्या सुरुच
महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता. बैठक झाली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची समपर्क उतरे अधिकाऱ्यांकडे नाहीत. प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे शिवाजी गुरव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com