घटस्थापनेसाठी बाजारपेठेची तयारी

घटस्थापनेसाठी बाजारपेठेची तयारी

37807
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीत रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.

साहित्य खरेदीसाठी मंडईत गर्दी
घटस्थापना रविवारी ः रताळे, खजुरांची आवक वाढली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : घटस्थापना रविवारी (ता. १५) असल्याने आज लक्ष्मीपुरीसह महाद्वारे रोड, कपिलतीर्थ, पापाची तिकटी, महापालिका चौक, श्री अंबाबाई मंदिर परिसरात साहित्य खरेदीसाठी गर्दी होती.
घटस्थापनेच्या साहित्यामध्ये लोटकं (सुगडी), पत्रावळी, नाडापुडी पाच धान्यांची पाकिटे, खाऊची पाने, फुले, माती, पवतं, फुलांची माळ उभी करण्यासाठी लागणारा दोऱ्यांचा समावेश आहे. याबरोबर नऊ दिवस उपवासाकरीता खजूर लागते. त्यांची मोठी आवक झाली आहे. जायदी खजुरांना अधिक मागणी आहे. ही खजुर स्वस्तही आहे.
लक्ष्मीपुरीतील खाऊच्या पानांसाठी आरग, बेडग, मिरज (जि. सांगली) भागातून एक हजार ते १२०० पर्यंत करंड्यांची आवक सुरु आहे. मलकापूर, चंदगड, बेळगाव भागातून उपवासासाठी रताळे आली आहेत. लाल रंगांच्या रताळे चविला उत्कृष्ठ असून, प्रतिकिलो ५० रुपयाला विक्री सुरू आहे. बेळगाव मार्केटमधून पाच ते दहा हजार पोती शहर, जिल्ह्यासाठी रताळ्यांची आवक सुरु आहे. नवरात्र होईपर्यंत ही मागणी अधिक वाढू शकते, असे काही रताळे विक्रेत्यांनी सांगितले.

कोट
लाल रंगांचे रताळे चवीला चांगले असते. उपवासाच्या काळात हे रताळे अधिक खाल्ले जाते.
-एम. के. पाटील, व्यापारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com