पालखीच्या गर्दीचे व्यवस्थापन व्हावे

पालखीच्या गर्दीचे व्यवस्थापन व्हावे

लोगो- वेध नवरात्रोत्सवाचे
................
फोटो- 37843 ,37818,37819
...
शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ
अंबाबाई मंदिरातील तयारी पूर्णः दहा दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (ता.१५) पासून सर्वत्र पारंपरिक उत्साहात प्रारंभ होणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई, भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरासह नवदुर्गा मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे. सलग दहा दिवस शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
अंबाबाई मंदिरात गेली पंधरा दिवस तयारी सुरू आहे. त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. यावेळी काही सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी देवस्थान समिती सचिव सुशांत बनसोडे, तहसीलदार स्वप्निल रावडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, सुयश पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सचिन जाधव, अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे आदी उपस्थित होते.
...
दृष्टीक्षेपात नवरात्रोत्सव...
० अंबाबाई मंदिराकडे दर्शनाकरीता येणाऱ्या पुरुष व महिला भाविकांसाठी एकत्रितरित्या मुख्य दर्शन रांग ही भवानी मंडप येथून सुरु होवून शेतकरी संघाच्या इमारतीमधून जुना राजवाडा पोलिस स्टेशन समोरील मंडपामधील रांगेतून पूर्व दरवाजातून मंदिरात जाईल आणि दर्शनानंतर भाविक उर्वरित तीन दरवाजांतून बाहेर पडतील.
० विद्यापीठ हायस्कूल दरवाजाकडील वाहनतळाच्या समोर मोफत चप्पल स्टॅंन्डची सुविधा असेल. भवानी मंडप येथे शेतकरी संघाच्या इमारती समोर तात्पुरते चप्पल स्टॅंड असेल.
० बॅगा ठेवण्यासाठी पागा इमारत येथे लॉकर्सची सुविधा करण्यात आली आहे. अंबाबाई मंदिर परिसरामध्ये गणपती चौक येथून व महाव्दार दरवाजा समोरील तात्पुरत्या जिन्यातून मुखदर्शनाची व्यवस्था केली आहे.
० ललिता पंचमीच्या सोहळ्यासाठी १९ ऑक्टोबरला श्री अंबाबाईची पालखी श्री त्र्यंबोली मंदिराकडे जाणार आहे. २२ ऑक्टोबरला रात्री साडेनऊला देवीची नगरप्रदक्षिणा होईल. २४ ऑक्टोबरला देवीची पालखी सायंकाळी पाचला दसरा चौकातील शाही दसरा सोहळ्यासाठी जाणार आहे.
० थेट दर्शनासाठी मंदिर परिसरात १२ बाय १० फुटाच्या कायमस्वरुपी चार स्क्रीन बसवल्या असून शहरातील दहा ठिकाणी तात्पुरत्या एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेतही टीव्ही स्क्रीनवरून थेट दर्शन मिळणार आहे.
० अंबाबाई मंदिरात दुपारी दीड ते सायंकाळी पाऊणे आठ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
............
शिव प्रतिष्ठानतर्फे दुर्गामाता दौड
श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने रविवार (ता.१५) पासून सकाळी सात वाजता सानेगुरुजी वसाहतीतील तुळजाभवानी मंदिरापासून श्री दुर्गामाता दौड उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दररोज अनुक्रमे यादवनगर, मंगळवार पेठ, मुक्तसैनिक वसाहत, फुलेवाडी, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठ, पाचगाव, लक्षतीर्थ वसाहत, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी शहरातील विविध भागातून हा उपक्रम होणार आहे.
...
शिवाजी चौकात सोंगी भजन स्पर्धा
छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने यंदाही सोंगी भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.१५) सायंकाळी सहा वाजता उद्योजक बसवराज आजरी, उद्योजक आशिष अंगडी यांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी बाल स्वामी समर्थ सोंगी भजनी मंडळ (शनिवार पेठ) या भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. सोमवारी (ता.१६) जगदगुरु संगीत भजनी मंडळ (आणूर), मंगळवारी (ता.१७) राम कृष्ण हरी भजनी मंडळ (गडमुडशिंगी), बुधवारी (ता.१८) माऊली भजनी मंडळ (वाटंगी), गुरुवारी (ता.१९) विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ (बुजवडे), शुक्रवारी (ता.२०) श्री विठ्ठलपंथी भजनी मंडळ (दुर्गुळवाडी), शनिवारी (ता.२१) अवधूत चिंतन भजनी मंडळ (सोन्याची शिरोली), रविवारी (ता.२२) स्वामी समर्थ भजनी मंडळ (दौलतनगर), सोमवारी (ता.२३) सदगुरू सोंगी भजनी मंडळ (कंदलगाव) ही भजने सादर होतील.
...
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे स्वच्छता
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान झाले. शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. माजी उपमहापौर सुनील पाटील, विनायक फाळके, सत्तार मुल्ला, संजय कुराडे, अच्युतराव साळोखे, भैय्या मोहिते, कुमार साळोखे, धनाजी यादव, सुहास सालोखे, मनोज लोट, अब्दुलहमीद मीरशिकारी, माजी नगरसेविका रेखाताई आवळे, जायदा मुजावर, पूजा साळोखे, रेहाना नागरकट्टी, बेनझीर नदाफ आदी उपस्थित होते.
........
......

पालखीवेळी गर्दीचे हवे व्यवस्थापन
भाविकांची मागणीः गर्दीमुळे चेंगराचेंगरी, बेशुध्द पडण्याच्या प्रमाणात वाढ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (ता.१५) पासून प्रारंभ होणार आहे. उत्सवकाळात रोज रात्री श्री अंबाबाईचा पालखी सोहळा होणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षात पालखीवेळी मोठी गर्दी होत असून चेंगराचेंगरी आणि कधी कधी बेशुध्द पडण्याचे प्रकारही घडतात. या पार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवात या गर्दीचे योग्य व्यवस्थापन व्हावे, अशी मागणी भाविकांतून होवू लागली आहे.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील गेली अनेक वर्षे या पालखी सोहळ्याचे साक्षीदार आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही सूचना सांगितल्या. पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत दर्शन बंद ठेवले जाते. पण, पालखी प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर पडली की मुख्य दर्शन रांग काही काळ सुरु ठेवणे शक्य आहे. पालखी पूजनासाठी येणाऱ्या ‘व्हीआयपीं’साठीचा फौजफाटा कमी केल्यास त्यांच्यासाठी जाणारा अनावश्यक वेळही वाचेल आणि गर्दीही कमी होईल. पालखीचे निमित्त आणि केवळ टाईमपाससाठी म्हणून येणाऱ्या तरुणाईची संख्याही गेल्या काही वर्षांत वाढू लागली आहे. अशा तरुणांवर ‘सीसीटीव्ही’ सारख्या माध्यमांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणे शक्य आहे, अशा काही सुचना त्यांनी मांडल्या.
...
० अशा आहेत सूचना
- विनाकारण रेंगाळणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर ठेवून त्यांना बाहेर काढता येईल.
- चारही दरवाजांवर आतील गर्दीचा अंदाज घेवूनच भाविकांना आत प्रवेश दिला जावा.
- पालखी पूजनावेळी ‘व्हीआयपीं’च्या निमित्ताने होणारी अनावश्यक गर्दी टाळता येणे शक्य आहे.
- अगोदरच मंदिराच्या आवारात कट्ट्यावर येवून बसणाऱ्यांवर नियंत्रण हवे.
- स्थानिक भाविकांनी रोज पालखीला येण्याचा मोह टाळावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com