डाक निर्यात केंद्र

डाक निर्यात केंद्र

Published on

डाक निर्यात केंद्राची संख्या
वाढवण्यात येणार ः ढमणगे

कोल्हापूर, ता. ३१ ः स्थानिक उद्योजकांना आपली उत्पादने परदेशात पोहचवण्यासाठी टपाल विभागाने ‘डाक निर्यात केंद्र’ सुरू केली आहेच. या केंद्रातून जगातील १९८ देशात उत्पादने पाठवता येतात. गेल्या दोन वर्षांपासून सेवा सुरू आहे. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डाक निर्यात केंद्राची संख्या वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती टपाल विभागाचे मार्केटिंग एक्झिकेटिव्ह सौरभ ढमणगे यांनी दिली.
टपाल केंद्रात आंतरराष्‍ट्रीय, स्पीड पोस्ट, एअर पार्सल तीस किलोपर्यंतचे वजन व उत्पादन पाठवतात येतात त्यासाठी १ लाख पर्यंतचे विमा संरक्षण आहे. वरील सर्व प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीतून होते. उद्योजकांना आपल्या कंपनीतून दुकानातून किंवा कामाच्या ठिकाणवरून पार्सल सेवेचा लाभ घेता येतो. प्रत्येक ग्राहकाला स्वतः नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे. प्रत्येक देशाच्या पार्सलचा दर वेगवेगळा आहे, त्याची तपशीलवार माहिती डाक निर्यात पोर्टलवर मिळते.
पोर्टलवर पार्सल बुकिंग झाल्यावर केवळ पाठवण्यासाठी टपाल कार्यालयात जावे लागते. त्यामुळे रांगेत थांबण्याची गरज उरत नाही.

चौकट
यांना होईल लाभ
ग्रामीण भागातील महिला उद्योजक, कुशल कारागिर, स्वयंरोजगार कर्ते यांनाही आपली उत्पादने परदेशी बाजारपेठेत पाठविता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना परदेशी बाजारपेठेत स्थान मिळणार असल्याने त्याचा लाभ स्थानित उलाढाल वाढीसाठी होऊ शकतो.

चौकट
दृष्टिक्षेपात कोल्हापूर विभाग
डाक निर्यात केंद्रे- १२२
या केंद्राचा लाभ घेणारे उद्योजक- ८१४

चौकट
येथे सुविधा
कोल्हापुरात शनिवार पेठ, इचलकरंजीसह पाच टपाल कार्यालयात सुविधा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.