जैन समाज मिरवणूक

जैन समाज मिरवणूक

42816

अंकिता राठोडने घेतला
जैन दिक्षा संन्यासचा मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः जैन श्वेतांबर समाजामधील सुरेश तेजमलजी राठोड यांच्या परिवारातील अंकिता सुनील राठोड हिने जैन दीक्षा संन्यासचा मुहूर्त घेऊन शहरात मिरवणुकीने प्रवेश केला. समस्त राजस्थानी जैन श्वेताम्बर समाजातील बांधवांच्या वतीने अंकिताचे कावळा नाका येथे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक निघाली. यामध्ये जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कावळा नाका येथील सयाजी हॉटेलपासून मिरवणूक सायबर चौक येथून जैन उपाश्रय महावीर भुवन येथे आली. येथे स्थित परमपूज्य मुनीवर कृपाशेखर महाराज यांचे तसेच परम पूज्य साध्वीजी अचित्यप्रभाश्रीजी यांचे आशीर्वाद अंकिताने घेतले. या वेळेला अंकिताचे आजोबा सुरेश राठोड, पुखराज राठोड, नंदू राठोड, सुनील राठोड, मनोज राठोड, शीतल राठोड, जवाहर गांधी, नगरसेवक ईश्वर परमार, योगेश कांगटाणी, आकाश राठोड, अभिषेक राठोड, दिपक ओसवाल आणि इतर समाज बांधव, वासूपूज्य युवा मंडळ, माता भगिनी युवा उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com