जैन दीक्षा

जैन दीक्षा

Published on

जैन श्वेतांबर समाजातर्फे
अंकिता राठोड यांचे स्वागत

कोल्हापूर ः संन्यस्त आश्रमाचा स्वीकार करणाऱ्या अंकिता राठोड यांच जैन श्वेतांबर समाजाने स्वागत केले. यानिमित्त श्री वासुदेव जैन मंदिर ट्रस्टपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली.अडीच वर्षापासून सुरीश्वरजी महाराज आणि साध्वी दर्शनप्रभाश्रीजी यांच्या संपर्कात असलेल्या अंकिता राठोड यांनी संन्यास घेण्याच्या दृष्टीने अध्यात्मिक प्रवचनाचा लाभ घेण्यास सुरुवात केली. सुनील राठोड यांच्या सहकुटुंबीयांनी अखेर त्यांना संन्यास घेण्यास परवानगी दिली. त्याचे स्वागत म्हणून जैन श्वेतांबर समाजाच्यावतीने दुचाकी रॅली काढण्यात आली. खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयापासून दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. ताराराणी चौक, टेंबलाई उड्डाणपूल, मराठा बटालियन रोड, राजाराम महाविद्यालय, सायबर चौक मार्गे एसएससी बोर्ड चौकातून ही रॅली प्रतिभा नगर इथली मंदिराजवळ आली. माजी नगरसेवक ईश्वर परमार, जयेश ओसवाल, हिम्मत राठोड, सुरेश राठोड, पुखराज राठोड, चंद्रकांत राठोड, भरत ओसवाल, दिविजय रायगांधी, नरेंद्र राठोड, जवाहर गांधी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.