राहुल राजापुरे यांना काव्यशिरोमणी पुरस्कार

राहुल राजापुरे यांना काव्यशिरोमणी पुरस्कार

Published on

ich36.jpg
42878
इचलकरंजी : राजापुरे यांना ‘काव्यशिरोमणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राहुल राजापुरे यांना ‘काव्यशिरोमणी’ पुरस्कार
इचलकरंजी : सोपानबाग, पुणे येथे प्रभावती साहित्य समूह आणि काकडे-देशमुख शिक्षण संस्थेतर्फे पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन झाले. यामध्ये इचलकरंजी येथील राहुल राजापुरे यांना ‘काव्यशिरोमणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ गझलकार किरण वेताळ, माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, विजय काकडे, शरदचंद्र काकडे, रोहिणी पराडकर उपस्थित होते.
---------------
ich37.jpg
42879
इचलकरंजी : गुरुकुलतर्फे स्वीकार हारगुले याचा सत्कार करण्यात आला.

स्वीकार हारगुले याची निवड
इचलकरंजी : अब्दुललाटमधील गुरुकुलच्या स्वीकार रणजित हारगुले याची सौदी अरेबिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित एशियन डॉजबॉल चॅम्पियनशिप निवड चाचणी बेंगलोर येथे झाली होती. या निवड चाचणीमध्ये महाराष्ट्र संघाकडून स्वीकारने सहभाग नोंदवला होता. यामध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची भारतीय संघामध्ये निवड झाली. जानेवारी २०२४ मध्ये रियाद, सौदी अरेबिया येथे आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी स्वीकार हारगुले भारताचे नेतृत्व करेल. डॉजबॉलमधील सततचा सराव, मेहनत व जिद्द या गुणांमुळेच त्याला यश मिळाले आहे. त्याला क्रीडाशिक्षक सुहास कुलकर्णी, गुरुकुलचे संस्थापक-अध्यक्ष गणेश नायकुडे, नवीता नायकुडे, मुख्याध्यापिका बालिका पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
-------------
42880
पार्थ मिरगेस चार सुवर्ण, एक रजत
इचलकरंजी : गोवा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत इचलकरंजीच्या पार्थ मिरगे याने मॉडर्न पॅन्टाथलोन क्रीडा स्पर्धेत चार सुवर्ण आणि एक रजत पदक पटकावले. स्पर्धा फोंडा (गोवा) येथे झाल्या. स्पर्धेत पार्थने जबरदस्त कामगिरी बजावली. त्याने बायथले या क्रीडा प्रकारात वैयक्तिक एक सुवर्ण, रिलेमध्ये एक सुवर्ण आणि टीम इव्हेन्टमध्ये एक सुवर्ण पदक मिळविले. ट्रायथले या क्रीडा प्रकारात वैयक्तिकमध्ये एक रजत पदक आणि टीम इव्हेन्टमध्ये एक सुवर्ण पदक मिळवले. अशी एकूण पाच पदकांची कमाई केली आहे. त्याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे. त्याला राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
----------------------
शेतमजुरांना सुविधा देण्याची मागणी
इचलकरंजी : शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या (आयटक) शिष्टमंडळाने येथील प्रांत कार्यालयास भेट दिली. यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांना दिले. निवेदनात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने आहेत. त्यांचा आता ऊस गाळप हंगाम सुरू होत आहे. त्यासाठी परजिल्ह्यातून, परराज्यांतून फडकरी ऊस तोडणी कामगार, शेतमजूर येत असतात. त्यांना साखर कारखान्यांनी योग्य ती सुविधा देणे गरजेचे आहे. सहकारी साखर कारखान्यांनी त्यांना धान्य मोफत, आरोग्य तपासणी यासोबत जीवनावश्यक सुविधा पुरवाव्यात, असे नमूद केले. शिष्टमंडळात हणमंत लोहार, महेश लोहार, सर्जेराव खोत, बाळासो चौगुले आदींचा समावेश होता.
-----------------
ich39.jpg
42881
इचलकरंजी : मनसेच्यावतीने मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात देण्यात आले

माध्यान्ह भोजन योजना सुरू करण्याची मागणी
इचलकरंजी : बांधकाम कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली माध्यान्ह भोजन योजना पुन्हा सुरू करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजनेचा भाग असलेली माध्यान्ह आहार योजना बंद केली आहे. यामुळे अन्नपुरवठा उद्योगात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांचा रोजगार बंद झाला आहे. परिणामी बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ येत आहे. बरेचसे कामगार हे या योजनेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करावी, असे नमूद केले आहे. शिष्टमंडळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.
------------------
‘आनंदाचा शिधा’ सरसकट द्यावा
इचलकरंजी : इचलकरंजी पुरवठा कार्यालयात पुरवठा अधिकारी नियुक्ती व ‘आनंदाचा शिधा’ सरसकट द्यावा, या मागणीचे निवेदन दलित पॅंथरतर्फे प्रांताधिकारी कार्यालयाला दिले. निवेदनात सात महिन्यांपासून पुरवठा कार्यालयात मुख्य अधिकारी नसल्याने कार्डधारकांची अडचण होत आहे. तसेच धान्य वितरण व्यवस्थित होत नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. सोबत आनंदाचा शिधा ही सर्व कार्डधारकांना व दीपावलीपूर्वी द्यावा, असे नमूद केले आहे. शिष्टमंडळात अशोक कांबळे, शशिकांत ओहळ, रवी कांबळे, मनोज कमलाकर, संजय पोळ, अतुल नवाळे सहभागी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.