सायंकाळी सहा ते रात्री बारा सर्वाधिक अपघात

सायंकाळी सहा ते रात्री बारा सर्वाधिक अपघात

अपघाताचा क्ली पार्ट वापरता येईल.

सहा ते बारा... वेगाला आवरा...
जिल्ह्यात सायंकाळनंतरच सर्वाधिक अपघात ः आरटीओने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट

लुमाकांत नलवडे - सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ - दिवसभर वाहनांची वर्दळ असली तरीही सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक अपघात झाले आहेत. विशेष म्हणजे या अपघातात ठार झालेल्यांची संख्याही अधिक आहे. सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यानच्या आकडेवारीवरुन हे दिसले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यातील अपघातांचे विश्‍लेषण केले आहे. त्यामध्ये कोणत्या वेळी, किती अपघात झाले आहेत, किती ठार तर किती गंभीर झाले याचा लेखाजोखा तयार केला आहे. त्यातून सायंकाळी सहा ते रात्री बारा ही वेळ अपघातासाठी धोक्याची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाहनांची संख्या वाढली आहे. रस्ते अपुरे आहेत अशी स्थिती असली तरीही जिल्ह्यात सर्वाधिक अपघात सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अपघात नेमके कधी होतात यासह अन्य बाबींची माहिती पाहता सप्‍टेंबर २०२२ ते २०२३ दरम्यान एकूण ९५४ अपघात झाले आहेत. यामध्ये रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत केवळ ८१ अपघात झाले आहेत, तर सकाळी सहा ते दुपारी बारा दरम्यान २३९ अपघातांची नोंद झाली आहे. तसेच दुपारी बारा ते रात्री आठ दरम्यान ३०२ अपघात झाले आहेत. तर रात्री आठ ते बारा दरम्यान चोवीस तासांतील सर्वाधिक ३३२ अपघात झाले आहेत.
------------------------------
कारणे अशी
-वाहनाचा वेग अधिक असणे
-दारू पिऊन वाहन चालविणे
-वाहनावरील ताबा सुटणे
-रस्त्याचा अंदाज न येणे
-------------------------------
कोट
शासन स्तरावर अपघात रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तरीही मानवी चुकांमुळे अपघात होत आहेत. सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान झालेल्या अपघातांचे विश्‍लेषण केले असता सायंकाळी सहा ते रात्री बारा दरम्यान अधिक अपघात होत आहेत. कार्यालयातून घरी जाण्याची ही वेळ असते. त्यामुळे वाहनांचा वेग अधिक असतो. यासह अन्य कारणे दिसली आहेत.
रोहित काटकर, सहायक परिवहन अधिकारी, कोल्हापूर
---------------
आकडेवारीवर दृष्टिक्षेप...

वर्ष वेळ - ००.०० ते ५.५९ ६.०० ते ११.५९ १२.०० ते १७.५९ १८.०० ते २३.५९ एकूण
२०२२ - एकूण अपघात - १५ २१ ३५ ४० १११
अपघातात मयत - ४ ७ ९ १३ ३३
गंभीर दुखापत - ७ ९ १४ १७ ४७
किरकोळ दुखापत - २ २ ३ ३ १०
जखमी नाही - २ ३ ९ ७ २१
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वर्ष वेळ - ००.०० ते ५.५९ ६.०० ते ११.५९ १२.०० ते १७.५९ १८.०० ते २३.५९ एकूण
२०२३ - एकूण अपघात - २२ २९ ३५ ५० १३६
अपघातात मयत - ८ ११ १५ १८ ५२
गंभीर दुखापत - ४ ९ १६ २९ ५८
किरकोळ दुखापत - २ २ १ ३ ८
जखमी नाही - ८ ७ ३ ० १८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com