‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास प्रतिसाद

‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास प्रतिसाद

42988

‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास प्रतिसाद
व्हिजन इचलकरंजीतर्फे आयोजन : आणखी दोन दिवस चालणार उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.३ ः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी व्हिजन इचलकरंजीतर्फे आयोजित केलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमास शहर व परिसरातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमाला शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांकडून कपडे जमा होत आहेत. जमा झालेले कपडे व इतर साहित्य सायंकाळी गरजूंना वाटप करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोल्हापूरनंतर इचलकरंजीत व्हिजन इचलकरंजी या संस्थेतर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ‘नको असेल ते द्या व हवे असेल तर ते घेवून जा’ या घोषवाक्याखाली हा उपक्रम राबवला जात आहे. यंदाही गरजूंची दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्याला शहर व परिसरातील नागरिकांतून प्रतिसाद मिळत आहे.
व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. ए. खोत, भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले, माजी नगरसेवक श्रीरंग खवरे, अध्यक्ष कौशिक मराठे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‍घाटन झाले. अशोक पाटणी, विजय पाटील, अमित कुंभार, राजेश व्यास, विजय कुडचे, प्रकाश खारगे, पवन टिबडेवाल, उल्हास अतीतकर आदी उपस्थित होते.
पाच नोव्हेंबरपर्यंत व्यंकटराव हायस्कूल येथे हा उपक्रम सुरु राहणार आहे. येथे कपडे व खेळणी, फराळ यासह इतर साहित्य नागरिक जमा करत आहेत. या वस्तूंचे वाटप शहरातील विविध ठिकाणी तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फिरणारे बाजारपेठेतील गरजू नागरिकांना करण्यात येत आहे. या उपक्रमाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-----
माणूसकी फौंडेशनचे सहकार्य
जमा झालेले साहित्य आवश्यक ठिकाणी वाटप करण्यासाठी ‘व्हिजन इचलकरंजी’ संस्थेची टीम कार्यरत आहे. त्यासाठी माणुसकी फौंडेशनचे रवी जावळे सहकार्य मिळत आहे. व्यंकटराव हायस्कूलमधील कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्वाचा ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com