लबाडांच्या हातात कारखान्याची सुत्रे नकोत

लबाडांच्या हातात कारखान्याची सुत्रे नकोत

लबाडांच्या हातात कारखान्याची सुत्रे नकोत
जयवतंराव शिंपी ः आजरा कारखान्याबाबत शिंपी- चराटी गटाची भूमिका
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. 3 ः आजरा साखर कारखाना एकहाती चालवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. कोणतीही सहकारी संस्था निकोप माणसांच्या हाती राहिल्यास त्या संस्थेची प्रगती होते. आजरा साखर कारखान्यातील विष्णुपंत केसरकर, सुधीर देसाई यांचा इतिहास तपासून पहा. अनेक धक्कादायक बाबी समोर येतील. एकीकडे तालुक्यातील ऊस बाहेर जात असताना अध्यक्ष प्रा. शिंत्रे व श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी कर्नाटकातून ऊस आणून कारखान्यावर खर्चाचा बोजा टाकला. त्यामुळे ढोंगी व लबाडांच्या कारखान्याची सुत्रे नकोत, असे प्रतिपादन कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी केले.
येथील आजरा अर्बन बॅंकेमध्ये शिंपी- चराटी गटाची पत्रकार बैठक झाली. यावेळी शिंपी यांनी सत्ताधारी गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘कारखाना स्थापनेपासून मी संस्थेशी जोडून आहे. ज्यांना साधे बॉयलरचेही ज्ञान नाही अशी मंडळी आता कारखाना चालवण्याची भाषा करीत आहेत. बेरिंग चोरी प्रकरणात निष्पापांना शिक्षा झाली.’ माजी अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, ‘कारखाना ताब्यात दिल्यास केंद्र व राज्य सरकारकडून निश्चितच मदत मिळणार याची खात्री आहे. बिनविरोधाची चर्चा कधीही नाकारलेली नाही.’ दिगंबर देसाई, जनार्दन टोपले, मलिककुमार बुरुड, अतिशकुमार देसाई यांनी मते मांडली. सुनिता रेडेकर, दशरथ अमृते, विलास नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com