परीख पुलासाठी दावा

परीख पुलासाठी दावा

Published on

परीख पूल रूंदीकरणासाठी दावा
कोल्हापूर ः रेल्वेचे गेट नंबर एक ताबडतोब सुरू करावे व परीख पुलाचे रूंदीकरण व मजबुतीकरण करावे यासाठी परीख पूल नुतनीकरण समितीने महापालिका व रेल्वे प्रशासनाविरोधात आज येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.
पर्यायी व्यवस्था न करता रेल्वेने गेट नंबर एक वाहतुकीसाठी बंद केले. त्यामुळे परीख पुलाखालून वाहने व पादचारी जात आहेत. हा पूल पावसामुळे धोकादायक बनला आहे. तसेच त्या पुलावरच रेल्वेने नवीन प्लॅटफॉर्म बांधला आहे. त्याचाही भार परीख पुलावर पडत असून, त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. समितीने असोसिएशन ऑफ आर्किटेक्टच्या सहकार्याने पुलाच्या रूंदीकरणाचे व मजबुतीकरणाचे आराखडे सादर केले आहेत. पण रेल्वे व महापालिका प्रशासनाने काहीही केलेले नाही. या साऱ्यामुळे नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे असे दाव्यात म्हटले आहे. फिरोज शेख यांनी दावा दाखल केला आहे. तसेच न्यायालयाने याबाबत आदेश द्यावा अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.