मिशन रोजगार

मिशन रोजगार
Published on

‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ उद्यापासून
दोनशे अठ्ठेचाळीस कंपन्याचा सहभाग ः १२५०० तरुणांची नोंदणी

कोल्हापूर, ता. ३ ः आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत आयोजित कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरच्या नोंदणीला प्रतिसाद मिळाला आहे. या जॉब फेअरमध्ये २४८ नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, बारा हजार पाचशे इच्छुकांनी नोंदणी केली आहे. साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पस् येथे पाच आणि सहा नोव्हेंबरला जॉब फेअर होणार आहे.
आमदार ऋतुराज पाटील यांनी युवक-युवतींना रोजगाराच्या उत्तम संधी मिळवून देण्यासाठी ‘ज्ञान आस्था फाउंडेशन’, ‘द डेटा टेक लॅब’ व ‘नॅस्कॉम’ यांच्या सहकार्याने ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ आयोजन केले आहे. या ‘जॉब फेअर’साठी तेलंगणा, गुजरात, पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूरमधील अनेक नामंकित आंतरराष्ट्रीय कंपन्यासह एकूण २४८ कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या आहेत. आयटी, प्रोडक्शन, हेल्थ केअर, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोटीव्ह, फार्मा, हाऊसकिपींगसह विविध क्षेत्रातील नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी साळोखेनगर कॅम्पस् येथे मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पाडणार आहेत. त्यामध्ये टेक महिंद्रा, बॉश, एलटीआई- माईंड ट्री, विप्रो-पारी, टाटा इव्ही, व्यंकीज, मॅनकाईंड, सिंटेल आदी कंपनींचा सहभाग आहे. पूर्वनोंदणी केलेल्या नोकरी इच्छूकांसाठी मुलाखतीचे तंत्र, आवश्यक कौशल्ये, बायोडाटा याबद्दल ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने मार्गदर्शन केले आहे. नोंदणी केलेल्यांना मुलाखतीची वेळ कळवली जाईल. त्यानुसार उपस्थित राहून नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.