उत्तुरमध्ये दिपोत्सव उत्साहात

उत्तुरमध्ये दिपोत्सव उत्साहात
Published on

उत्तूरमध्ये दीपोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
उत्तूर ता. २८ : त्रिपुरारी पौर्णिमा व देव दीपावलीचे औचित्य साधून येथील नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कृष्णा व्हॅली अॅग्री अॅडव्हान्स्ड सेंटर, सह्याद्री निसर्ग मंडळ, जिजाऊ फाउंडेशन व आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेतर्फे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एक हजार पणत्या प्रज्वलित करून ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा, पृथ्वीला वाचवा’ असा संदेश दिला.
सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिववंदना व शिवरायांच्या जयघोषात १००० पणत्या प्रज्वलित केल्या. ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, विजय सावेकर, केशव पाटकर, विकास हत्तरगी, किरण चव्हाण, पर्यावरण मित्र जिल्हाध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पाणी बचतीचा संदेश देणारी प्रतिभा सुतार यांनी रेखाटलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. श्रेया पोवार, हर्षद कार्तिक व डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी यांची मनोगते झाली. प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी नियोजन केले. संध्या मोरबाळे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com