ताडीचा गुळ

ताडीचा गुळ
Published on

54442
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या बाहेरील रस्त्यावर तामिळनाडू येथील ताडीचा गूळ विकण्यासाठी आलेले विक्रेते.

ताडीच्या गुळाचे नागरिकांच कुतूहल
तामिळनाडूतील तीरुनेलवेली येथील विक्रेते कोल्हापुरात दाखल

प्रदीप शिंदे, सकाळ वृत्तसेवा
शाहू नाका, ता. २९ ः तामिळनाडूतून पहिल्यांदाच कोल्हापुरात विक्रीसाठी आलेला ताडीचा गुळ नागरिक कुतूहल आणि नव्या चवीसाठी खरेदी करत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या बाहेरील रस्त्यावर पाच ते सहा विक्रेते हा गूळ विकण्यासाठी आले आहेत.
कोल्हापूर जिल्हा गुळ ऊत्पादनामध्ये अग्रेसर म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यात ताडच्या झाडापासून तयार केलेला गूळ पहिल्यांदाच विक्रीसाठी आल्याने अनेक वाहनधारक कुतूहलाने याबाबत चौकशी करताना दिसतात. तामिळनाडूतील तीरूनेलवेली येथील विक्रेते प्रथमच कोल्हापूरात हा गूळ विक्रीसाठी आले आहेत. उपजिविकेचा हा पारंपरिक व्यावसाय असल्याने विविध शहरात ताडीच्या गुळाची विक्री करण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. ताडीचा साधा गूळ २२० तर आलेयुक्त गूळ २४० रुपये किलो दराने यांची विक्री केली जात आहे. या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हे विक्रेते सांगत आहेत.
दरम्यान, नारळाच्या झाडाप्रमाणेच ताड झाडाच्या बहुतांशी भागाचा वापर केला जातो. ताडीचा गुळ औषधी तर आहेच पण ''ब्लॅक टी व कॉफी''साठी त्याचा वापर केला जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कोट
ताडाच्या झाडाचा रस काढतात. त्या रसाला ताडी म्हणतात. त्या ताडीपासून गूळ तयार करण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. हा रस गोळा करून उकळवून गूळ तयार केला जातो. आरोग्यदायी असा हा गूळ साधारणपणे दोन ते तीन वर्षे टिकतो.
- राजू तेवर, विक्रेता

कोट
पारंपरिक व्यवसाय असला तरी गुळ निर्मिती करताना आणि त्याची विक्री करतानाही आरोग्याच्यादृष्टीने काही निकष पाळावेच लागतात. त्यादृष्टीने आवश्यक बाबींची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून केली जाणार आहे.
- तुषार शिंगाडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com