बिंदूचौक सुशोभीकरणासाठी संविधान सन्मान चे निवेदन

बिंदूचौक सुशोभीकरणासाठी संविधान सन्मान चे निवेदन

बिंदू चौक सुशोभीकरणासाठी निवेदन
कोल्हापूर ः बिंदू चौक येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशा मागणीचे निवेदन संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळातर्फे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांना देण्यात आले. निवेदनात बिंदू चौक येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, प्रवेशद्वारावर कमान उभारावी, माहिती फलक, संविधानाची उद्देशिका असावी या व अन्य मागण्या केल्या आहेत. सोमवारी (ता. १५) पर्यंत कामाला सुरुवात न झाल्यास २६ जानेवारीला सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. घाटगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाला सुरुवात करण्याची ग्वाही दिली. या वेळी संघटनाध्यक्ष नीलेश बनसोडे, उपाध्यक्ष शिवराम बुध्याळकर, सचिव आठवले, आरपीआय शहराध्यक्ष सुखदेव बुध्याळकर, वंचित युवा शहराध्यक्ष अमित नागपुरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, बसपाचे सुरेश आठवले, वंचित बहुजन माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष सचिन गुदगे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com