बिगस्टोरी ः निर्यात वाढली, उद्योगाची भरारी

बिगस्टोरी ः निर्यात वाढली, उद्योगाची भरारी

56123
56124
............

बिगस्टोरी

लघु, मध्यम उद्योजकांची निर्यातीत भरारी

प्रमाण वाढले; कोल्हापूरच्या उत्पादनांना मागणी

संतोष मिठारी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः केंद्र आणि राज्य शासनाचे प्रोत्साहन, उद्योजकांनी इच्छाशक्तीने टाकलेल्या पाऊलांमुळे कोल्हापूरची निर्यात वाढली असून उद्योगांनी भरारी घेतली आहे. त्यात लघु, मध्यम उद्योजकांचे प्रमाण वाढले आहे. जागतिक पातळीवर कोल्हापूरमध्ये तयार झालेल्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. त्याने निर्यातीचा टक्का वर्षागणिक वाढत आहे. निर्यातीचा आकडा ९ हजार ३६९ कोटींपर्यंत पोहोचला आहे.
विश्वासार्हता, गुणवत्ता कायम ठेवत उद्योजकांनी मेक इन कोल्हापूरची संस्कृती रूजविली आहे. मात्र, मोठे उद्योग वगळता इतरांची निर्यातीच्या अनुषंगाने पाऊले पडत नव्हती. कोरोनानंतरच्या विविध आव्हानांचा सामना करत उद्योग टिकवून ठेवताना त्यांनी निर्यात वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यात लघु, मध्यम उद्योजकांचा सहभाग वाढला. त्यांनी निर्यातीसाठी इच्छाशक्ती प्रबळ केली. त्यादृष्टीने उत्पादन निर्मितीची पाऊले टाकली. त्याला निर्यात प्रोत्साहन समितीने पाठबळ दिले. त्याचा चांगला परिणाम झाला. तीन वर्षांपूर्वी निर्यात करणाऱ्या जिल्ह्यातील लघु, मध्यम उद्योजकांचे प्रमाण कसेबसे एक टक्का होते. आता ते दहा टक्क्यांवर पोहोचले आहे. २०२२-२०२३ आर्थिक वर्षात ९ हजार ३६९ कोटींची निर्यात झाली. पुढील पाच वर्षात ती १८ हजार ६६७ कोटींपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवून निर्यात प्रोत्साहन समितीने पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.
.............
फेरस-नॉन फेरस, फॅब्रिकेशन क्षेत्रातून निर्यात
फेरस, नॉन फेरस कास्टिंग, फॅब्रिकेशन क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योजकांकडून निर्यात सुरू झाली आहे. कृषी क्षेत्र आणि डेटा स्टोरेज करणाऱ्या यंत्रणेची निर्मिती करणाऱ्या उद्योजकांकडून निर्यात प्रोत्साहन समितीकडे चौकशी केली आहे.

यंदा २०० उद्योजक करणार निर्यात
१८ महिन्यांत कोल्हापूरमधील २३ लघु आणि मध्यम उद्योजकांनी निर्यातीच्या अनुषंगाने जर्मनी, यु. के., टांझानिया, थायलंड, केनिया, इंडोनेशिया या देशांचा दौरा केला आहे. त्यातून त्यांना कामाच्या ऑर्डर मिळाल्या असल्याचे जिल्हा निर्यात प्रोत्साहन समितीचे चीफ प्रमोटर अमर जाधव यांनी सांगितले. निर्यात वाढविण्यासाठी उद्योजकांना निर्यात प्रोत्साहन समितीद्वारे मार्गदर्शन केले जाते. इंजिनिअरींग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलतर्फे जगभरातील उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी मदत केली जाते. यावर्षी नव्या २०० लघु व मध्यम उद्योजक निर्यात करतील यादृष्टीने नियोजन करून काम सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले.
..........
चार महिन्यांत १८६७ कोटींची उलाढाल
कोल्हापुरातून अमेरिका, इंडोनेशिया, बांग्लादेश, यु.ई. कोरिया, थायलंड, इटली, चीन देशांत निर्यात होते. कास्टिंग, स्टील, पंप्स्, फॅब्रिकेशन मटेरियल, कापड, फौंड्री उत्पादने, कोल्हापुरी गूळ, चप्पल, आजरा घनसाळ तांदूळ, आदींचा समावेश आहे. गतवर्षी एप्रिल ते जुलै चार महिन्यांत उद्योजकांनी १ हजार ८६७ कोटी रूपयांची निर्यात केली. कोल्हापुरी चप्पल, गूळ, मसाला, हुपरीतील चांदीचे दागिने, आदींचे जगभरात निर्यात वाढविण्यासाठी ब्रँडिंगवर जोर देणारे काही उपक्रम निर्यात प्रोत्साहन समिती यावर्षी राबविणार आहे. केनिया, टांझानिया, आदी आफ्रिकन देशांमध्ये निर्यातीच्या संधी वाढल्या आहेत. त्याठिकाणी कृषी अवजारे, बांधकाम क्षेत्राला लागणाऱ्या साधन-सामुग्रीची मागणी आहे.
..........
पुढील चार वर्षांतील निर्यातीचे ध्येय
वर्ष* रक्कम कोटींमध्ये
२०२४-२५* १०८२१
२०२५-२६*१२४४४
२०२६-२७*१४९३३
२०२७-२८*१८६६७
....................
क्षेत्रनिहाय जिल्ह्यातील निर्यातीचे प्रमाण
अन्नधान्य प्रक्रिया ३८ टक्के
इंजिनिअरींग २३ टक्के
वस्त्रोद्योग २० टक्के
कृषी ११ टक्के
इतर ६ टक्के
प्लास्टिक उत्पादने २ टक्के
............
कोट
जिल्ह्यातून निर्यात वाढत आहे. निर्यातीसाठी उद्योजकांना मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हा निर्यात प्रोत्साहन कक्षाची उद्योग केंद्रात सुरूवात केली आहे. निर्यात क्षेत्रातील संधींची माहिती देण्यासाठी दरवर्षी उद्योजकांची परिषद घेण्यात येते. त्यात परदेशातील तज्ञ उद्योजक येवून त्यांना आवश्‍यक निर्यात उत्पादनांची माहिती देतात. त्याचा चांगला परिणाम होत आहे.२३
-अजयकुमार पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र
...........
निर्यात वाढविण्यासाठी...
-ड्राय पोर्ट
-गूळ, इंजिनिअरींग क्लस्टर
-एनएबीएल टेस्टिंग लॅब
-वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांसाठी प्रदर्शन
-इंजिनिअरींग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलची प्रदर्शने
-कृषी आणि अन्न-धान्य प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com