मराठा लाईट बटालियन रॅली

मराठा लाईट बटालियन रॅली

56175
कोल्हापूर ः १०९ इन्फंट्री बटालियन मराठा लाईट इंन्फंट्री यांच्या किल्ले ते किल्ले या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवताना छत्रपती श्रीमंत शाहू महाराज.

सायकलवरून किल्ले मोहिम सुरू
मराठा लाईटच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः १०९ इन्फंट्री बटालियन टिए मराठा लाईटचा ऑगस्ट २०२४ मध्ये होणाऱ्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त किल्ले ते किल्ले सायकल मोहिमेची सुरूवात आज छत्रपती संभाजीराजे चौकातून झाली. छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘१०९ इन्फंट्री बटालियन टिए मराठा लाईट कोल्हापूरचा विजय असो’, ‘त्र्यंबोली माता की जय’, ‘हर हर महादेव’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
ही रॅली पन्हाळा येथील वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी रवाना झाली. पन्हाळा येथे संजय पाटील नावलीकर, आर. बी. पाटील, राजेंद्र वगरे उपस्थित होते. वीरमाता-पिता, वीरपत्नी यांच्या सहकार्याने सायकल रॅली विशाळगड कडे रवाना झाली. रॅली स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या वीर मावळ्यांना अभिवादन करण्यासाठी व गड किल्ल्यांच्या प्रति सद्भावना संवर्धनासाठी प्रवास करणार आहे.
या वेळी बिपीन कुमार, उमेश वलगड्डे, बसवराज पाटील, प्रदीप खंबे, रोहित बडवे, महेश पाटील कोळे, निखिल गंगले, नवनाथ पाटील, संदीप कांबळे, अनुज जंगम, जोतिबा पाटील, अनिल गुर्जर, जोतिबा माने, चंद्रहार पाटील, सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, उपाध्यक्ष अनिल पाटील, सरसेनापती संजय खाडे, रत्नाकर तिराळे, आनंदा पाटील, आनंदा मेटकर, एकनाथ पाटील, संजय शिंदे, आप्पा देसाई, नामदेव जगताप, नित्ती कुरणे, आकाराम मोरे, आकाराम सुभेदार, अजित कदम, कृष्णा गुरव, बाळू बामणे, दीपक सराटे, विजय पाटील, संजय माने, बी. एन. पाटील, समीर खानोलकर, सुभेदार राजेश सावंत, सुभेदार शिवाजी सावंत, सुभेदार विनोद खुडे, सुभेदार शिवाजी मर्दाने, बी एच एम मुंडे उपस्थित होते.
इतिहास वाचन हवलदार सचिन पाटील यांनी केले.
-----------
चौकट
रॅलीचा प्रवास असा
ही रॅली पन्हाळा, विशाळगड, सज्जनगड, वर्धनगड, सिंहगड, तोरणागड, पुरंदरगड, आजिंक्यतारा या किल्ल्यांना भेटी देणार आहे. रॅली शुक्रवारी (ता.१२) कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वार कमानीजवळ येणार आहे. कोल्हापूरातील सर्व माजी सैनिक संघटनांनी पदाधिकारी वीरमाता - पिता, वीरपत्नी, आजी सैनिक, माजी सैनिक पत्नी या रॅलीचे स्वागत करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com