गड-मुश्रीफ कार्यक्रम

गड-मुश्रीफ कार्यक्रम

56179
गडहिंग्लज : तहसील कार्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी हरुण सय्यद, ऋषिकेत शेळके, शरद मगर, बाबासाहेब वाघमोडे, सतीश पाटील आदी उपस्थित होते.
...

गोरगरीबांचा आशिर्वाद मिळवा
पालकमंत्री हसन मुश्रीफ : गडहिंग्लजला निराधार योजनेच्या प्रमाणपत्रांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : ‘कार्यालयातील इतर कामांतून आशिर्वाद मिळतच असतो. पण, खरा आशिर्वाद मिळवायचा असेल तर गोरगरीबांची कामे करा. त्यासाठी कोणतीही अपेक्षा करु नका’, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम झाला. याप्रसंगी श्री. मुश्रीफ बोलत होते. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कचेरी मार्गावरील बचत भवनमध्ये हा कार्यक्रम झाला.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले,‘निराधारांना पेन्शनच्या रुपाने मिळणाऱ्या रक्कमेचा मोठा आधार आहे. त्यामुळे त्यांना महिन्याच्या महिन्याला पेन्शन देण्याचा प्रयत्न आहे. अधिकाऱ्यांनीही निराधारांना पेन्शन मिळाली काय याची खात्री करुनच आपल्या पगार पत्रकावर सही करावी. कार्यकर्त्यांनीही समाजातील दुर्लक्षित घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा. या कामात आळसपणा करु नये. घरोघरी जाऊन लाभार्थी शोधावेत.’
तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात योजनांच्या कामकाजाची माहिती दिली. श्री. वाघमोडे, सिद्धार्थ बन्ने, हरुण सय्यद यांचीही भाषणे झाली. विविध योजनांच्या ३४१ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सतीश पाटील, शरद मगर, दीपक कुराडे, प्रकाश पताडे, रेश्मा कांबळे, शर्मिला मालंडकर, आशा पोवार, वसंतराव यमगेकर, सचिन देसाई, तानाजी कांबळे, उषा मांगले, रामगोंडा पाटील, महेश सलवादे, अमर मांगले आदी उपस्थित होते. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांनी आभार मानले.
...

* ...तर आठवडाभरात समिती
मुश्रीफ म्हणाले,‘राज्यात महायुतीची सत्ता आहे. संजय गांधी निराधार योजना समितीसाठी सत्तेतील तीन पक्षांचा फॉर्म्युला ठरला आहे. आमदार असणाऱ्या पक्षाला सहा तर उर्वरित दोन पक्षांना प्रत्येकी दोन जागा असे हे सूत्र आहे. यानुसार पक्षांनी आपापली नावे दिली तर आठवडाभरात समितीची स्थापना केली जाईल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com