अनिकेत,अभिषेक,श्रेयस ची राज्य संघात निवड

अनिकेत,अभिषेक,श्रेयस ची राज्य संघात निवड

56239, 56240, 56241

अनिकेत, अभिषेक, श्रेयस
यांची राज्य संघात निवड 

कोल्हापूर, ता. ६ ः कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेट खेळाडू अनिकेत नलवडे, अभिषेक निषाद व श्रेयस चव्हाण यांची २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू ट्रॉफीसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली. स्पर्धा चारदिवसीय साखळी पध्दतीने खेळवली जाणार आहे.    
आठ संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा ७ जानेवारी ते १८ फेब्रुवारीदरम्यान विविध राज्यांमध्ये होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रासह  सौराष्ट्र , पंजाब, झारखंड, आसाम, ओडिशा, छत्तीसगड व त्रिपुरा संघांचा समावेश आहे. स्पर्धेसाठीच्या संघाची पुणे येथे झालेल्या निवड चाचणीतून निवड करण्यात आली आहे.  
अनिकेत नलवडे याने अनेकदा महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यापूर्वी वेस्ट झोन संघात दोन वेळा निवड होऊन स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यासह विजय मर्चंट ट्रॉफी, कुचबिहार ट्रॉफी, कर्नल सी. के. नायडूसह एकदिवसीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. अभिषेक निषाद महाराष्ट्र संघात दोनवेळा कुचबिहार ट्रॉफी स्पर्धेत ७ सामन्यांत ४४ बळी घेत भारतातील अव्वल गोलदांज ठरला. या कामगिरीच्या जोरावर त्यांची राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीच्या कॅम्पसाठी निवड झाली होती. विनू मंकड ट्रॉफीसाठी सलग दोन वर्षे निवड झाली होती. श्रेयस चव्हाण महाराष्ट्र संघासह विनू मंकड ट्रॉफी, एकदिवसीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com