महापालिकेला दोन कोटीचे बक्षीस

महापालिकेला दोन कोटीचे बक्षीस

लोगो
...
मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत
कोल्हापूर महापालिका प्रथम
विभागीय स्तरावर मिळणार दोन कोटी रुपयांचे बक्षीस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेतर्गत कोल्हापूर महापालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला आहे. विभाग स्तरावरील दोन कोटी रुपयांचे बक्षीस महापालिकेला मिळणार आहे. महापालिकेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचे सादरीकरण मंगळवारी (ता.९) होणार आहे.
नगर विकास विभागातर्फे मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा घोषित करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत समितीने कोल्हापूर शहराची तपासणी मागील महिन्यामध्ये केली होती. पुणे विभागात ‘ड'' वर्ग महापालिकेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आला आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात आले होते. स्पर्धेमध्ये प्रामुख्याने शहरातील चौक सुशोभिकरण, प्रमुख इमारती, वारसास्थळे, जलाशयांची देखभाल, कचरा संकलन, अतिक्रमण कारवाई, मालमत्ता कर संकलन, वाचनालय व्यवस्था, नाविन्यपूर्ण योजना, सार्वजनिक वाहन स्थळ, पाणीपुरवठा, तीर्थक्षेत्रे वारसा स्थळांची जपणूक, सार्वजनिक उद्याने, आरोग्य सुविधा, शाळा परिसर स्वच्छता,ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, क्रीडांगणे सुस्थितीत ठेवणे आदी निकषांचा समावेश होता. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनीही विशेष परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com