सत्तर वर्षीय मोहन नातू यांची आज पाण्यात प्रात्यक्षिके

सत्तर वर्षीय मोहन नातू यांची आज पाण्यात प्रात्यक्षिके

56309
पाण्यात योगासने करताना मोहन नातू.


सत्तर वर्षीय मोहन नातू
यांची आज पाण्यात योगासने
पोहणे, योगासनांबाबत जागृतीसाठी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः अहमदनगर येथील सत्तर वर्षीय मोहन नातू उद्या (ता. ७) पाण्यात योगासनांची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. नातू हे मुळचे अहमदनगरचे असून त्यांची मुलगी येथील हनुमाननगरात आहे. तरुणाईने सर्वांगसुंदर व्यायाम असलेल्या पोहण्याबरोबरच योगासनांकडे वळावे, यासाठी राज्यभरात ते असे उपक्रम घेतात. त्याचाच एक भाग म्हणून गोखले कॉलेजसमोरील भवानी जलतरण तलाव येथे सकाळी नऊ ते दहा या वेळेत हा उपक्रम होईल.
नातू यशस्वी उद्योजक असून व्यवसायातून त्यांनी निवृत्ती घेतली आहे. शहिदांच्या वीरपत्नींसाठी दरवर्षी एक लाख अकरा हजारांची आर्थिक मदत ते देतात. बाराही महिने पोहण्याचा छंद त्यांनी जपला आहे. वयाच्या साठाव्या वर्षी सलग पंचवीस किलोमीटर आठ तास पोहण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. तरूण पिढीने पोहण्याचा छंदातून आरोग्यसंपन्न व्हावे, यासाठी त्यांनी आता संपूर्ण वेळ देण्याचे ठरवले आहे. पोहणे हा एक सर्वांगसुंदर व्यायाम आहे, आपणही आपल्या जीवनात पोहण्याच्या उत्तम व्यायामाला सुरुवात करुन निरोगी रहा आणि आयुष्यभर सर्व आनंदाचा उपभोग घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com