एक तास साहित्यासाठी

एक तास साहित्यासाठी

एक तास साहित्यासाठी
कविता रंकाळ्याकाठी...!
आजपासून प्रारंभ; करवीर साहित्य सभा राबविणार उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः ‘एक तास साहित्यासाठी, कविता रंकाळ्याकाठी’ हे ब्रीद घेवून नव्या वर्षात आता आणखी एक नवा साहित्यिक उपक्रम सुरू होणार आहे. प्रत्येक रविवारी साहित्यप्रेमी मंडळी रंकाळ्याच्या काठावर सायंकाळी पाचला एकवटणार असून त्यांनी लिहिलेल्या कविता व इतर साहित्याचेही वाचन करणार आहेत. उद्या (ता. ७) पासून रंकाळा पदपथ उद्यान परिसरात या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे.
कोल्हापूर शहर आणि परिसरातील नव साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे आणि रसिकांनाही या मैफलींचा आस्वाद घेता यावा, याच एकमेव उद्देशाने हा उपक्रम सुरू होणार आहे. त्यासाठी करवीर साहित्य सभा या नावाने वर्षभर हा उपक्रम होणार आहे. सुरवातीला या चळवळीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मंडळी आहेत. पण, त्यांनी विविध माध्यमातून नवोदित कवी, लेखक, साहित्यिकांना या उपक्रमासाठी निमंत्रित केले आहे.
प्रत्येक जण आपापल्या परीने विविध माध्यमातून अभिव्यक्त होत असतात. मात्र, सर्वांचीच ही अभिव्यक्ती पुस्तक रुपात येतेच असे नाही. त्यामुळे अशा सर्व हौशी कवी, लेखकांना त्यांच्या कविता, साहित्य सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर ही नवी संकल्पना पुढे आली आहे. यामध्ये कुठलेही शुल्क किंवा वर्गणीचा समावेश नसेल. इच्छुकांनी एकत्रित येवून आपले साहित्य सादर करावे आणि साहित्यप्रेमींची त्याचा आस्वाद घ्यावा, एवढाच या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे शीतल शेटे, मंगेश रावळ यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com