हुतात्मा गार्डन महादेव मंदिर जिर्णोद्धार

हुतात्मा गार्डन महादेव मंदिर जिर्णोद्धार

57388
कोल्हापूर : हुतात्मा गार्डनमधील श्रीलिंगेश्वर महादेव मंदिर


महादेव मंदिराचे पौराणिक सौंदर्य उजेडात
जय शिवराय मंडळाचा पुढाकार; हुतात्मा गार्डनमधील जयंती-गोमती संगमावर स्थान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ः हुतात्मा गार्डनमधील श्रीकृष्ण व महादेवाची पिंड एकत्र असलेले शहरातील एकमेव मंदिराचे पौराणिक रूप उद्यमनगर येथील जय शिवराय मंडळाच्या पुढाकाराने समोर आले आहे. हुतात्मा गार्डनमधील जयंती व गोमती या नद्यांच्या संगमावर वसलेले श्रीलिंगेश्‍वर महादेव मंदिराचे पौराणिक स्वरूप यानिमित्ताने करवीरवासियांसमोर येणार आहे. यासाठी हुतात्मा गार्डनच्‍या सदस्यांनीही त्यांना मदतीचा हात दिला आहे.
करवीर महात्म्यात उल्लेख असलेल्या श्रीलिंगेश्‍वर महादेव मंदिराला गेल्या अनेक वर्षांपासून ऑईलपेंटने रंग देऊन त्याचे मूळ सौंदर्य झाकोळले गेले. मंदिराच्या छताचीही बऱ्याच प्रमाणात पडझड झाली होती. मंदिराची दुरवस्था पाहून समाज उपक्रमात अग्रभागी असणाऱ्या जय शिवराय मंडळाने त्याचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. पहिली बाब समोर आली ती ऑईलपेंटने रंग दिल्यामुळे त्याचे मूळ पौराणिक रूप सर्वांसमोर आणणे गरजेचे होते. हे जाणून त्यांनी मंदिराच्या चारही बाजूचा रंग घासून काढला. छतही दुरुस्त केले. शिवाय ज्या भागात गळती होती तेथे वॉटर प्रुफिंग करून गळतीची समस्याही सोडवली. यासाठी त्यांना कोल्हापुरातील रंकभैरव टेंपल क्लिनिंग बॉईजच्या सदस्यांनी साथ मिळाली. आणि पाहतापाहता मंदिराचे मूळ स्वरूप नजरेत भरू लागले आहे. गार्डनमधील कंत्राटदार सतीश पाटील यांनीही त्यांना सहकार्य केले. सर्वांच्या एकजुटीतून या मंदिराचे पुर्नवैभव परत आले असून, या मंदिराचा लोकार्पण सोहळा राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यादिनीच म्हणजेच सोमवारी (ता. २२) आयोजित केला आहे. यावेळी धार्मिक विधी होतील. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पांडुरंग पाटील, शिवाजी नलवडे, जगन्नाथ म्हाळंग, श्रीकांत दळवी, नंदकुमार देशपांडे, संदीप देसाई, चंद्रकांत कांडेकरी यांनी सहभाग घेतला.
-------------------------
कोट
जयंती-गोमती नदीच्या संगमावर वसलेल्या श्रीलिंगेश्‍वर महादेव मंदिराच्या महापूर आणि काही कारणांने दुरवस्था झाली होती. ही दुरवस्था दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. श्रीकृष्ण व महादेव एकाच ठिकाणी असणारे हे मंदिर असल्याने या मंदिराला महत्त्‍व प्राप्त झाले आहे.
- पांडुरंग पाटील, सदस्य, जय शिवराय मंडळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com