Dr. Raghunath Mashelkar
Dr. Raghunath Mashelkaresakal

आयटी कंपन्या कोल्हापूरला आणण्यासाठी मी मदत करतो; ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकरांचं आश्वासन

‘शाश्‍वत विकास, कौशल्य, नवसंशोधन, तंत्रज्ञानाच्या वापरातून आपला देश भरारी घेत आहे.
Summary

नवतंत्रज्ञान, कल्पनेच्या गतीने अंमलबजावणी करत कोल्हापुरी दागिने, गूळ, साखर, चप्पल आदी व्यवसायाला जगभर नेण्याची पावले टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोल्हापूर : ‘शाश्‍वत विकास, कौशल्य, नवसंशोधन, तंत्रज्ञानाच्या वापरातून आपला देश भरारी घेत आहे. अशा स्थितीत क्षमता असलेल्या कोल्हापूरने मागे राहू नये, असे मला वाटते. उद्योग-व्यवसायासाठी नॉलेज रिसर्च, इनोव्हेशन क्लस्टर करा, त्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे. अग्रेसर आयटी कंपन्या (IT companies) कोल्हापूरला आणण्यासाठीही मदत करतो’, अशी ग्वाही ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar) यांनी येथे दिली.

Dr. Raghunath Mashelkar
Miraj Shivsena Melava : गद्दारांनी केलेला विश्वासघात जनतेला ठाऊक आहे; वरुण सरदेसाईंचा शिंदे गटावर घणाघात

येथील डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे आयोजित उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात त्यांनी ‘कोल्हापूरच्या उद्योग-व्यापार क्षेत्राचे भविष्य’ या विषयावर विचार मांडले. ‘प्रत्येक क्षेत्रात कोल्हापूरची थोडीफार वाढ आहे. मात्र, आता अधिक व्यापक विकासाची गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही येथे आयटी इंडस्ट्री (IT industry) वाढविण्यासाठी या क्षेत्रातील कंपन्या येण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याला आपण मदत करावी’, अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी डॉ. माशेलकर यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

‘यापुढील काळात नवकल्पना गेमचेंजर ठरणार आहेत. त्यामुळे नवकल्पना, संधीतून जागतिक पातळीवर भरारी घ्या. नवतंत्रज्ञान, कल्पनेच्या गतीने अंमलबजावणी करत कोल्हापुरी दागिने, गूळ, साखर, चप्पल आदी व्यवसायाला जगभर नेण्याची पावले टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे. पर्यटन, आरोग्य, सेवा क्षेत्रातील नव्या संधी साधण्यावर लक्ष द्यावे, असा सल्ला देत डॉ. माशेलकर यांनी भविष्यातील कोल्हापूरच्या वाटचालीची दिशा दाखविली.

Dr. Raghunath Mashelkar
Lek Ladki Yojana : आता कुटुंबात 'लेक लाडकी' ठरणार भाग्यशाली; पालकांना मिळणार एक लाख रुपये

आमदार पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरची सर्व क्षेत्रांत प्रगती व्हावी, यासाठी आम्ही काम करतोय. आता शहराची विमानसेवेची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. संकेश्वर- गोवा, गगनबावडा - कोकण, कोल्हापूर- पुणे या महामार्गाचे विस्तारीकरण सुरू आहे. त्यामुळे २०२६ हे साल कोल्हापूरच्या विकासाचे असेल. त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. कोल्हापूर मेडिकल टुरिझम बनले आहे. आपण सर्वांनी कोल्हापूरच्या चांगल्या गोष्टींचे ब्रँडिंग आवर्जून करायला पाहिजे.’

या कार्यक्रमात डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी डॉ. माशेलकर यांचा परिचय करून दिला. आमदार ऋतुराज पाटील यांनी आभार मानले. डॉ. ए. एन. जाधव, राकेशकुमार मुदगल, के. प्रथापन, प्रताप पुराणिक, ललित गांधी, आनंद माने, के. पी. खोत, नितीन वाडीकर, डॉ. सागर देशपांडे आदी उपस्थित होते. प्रा. मधुगंधा मिठारी, श्रुती काशीद यांनी सूत्रसंचालन केले.

Dr. Raghunath Mashelkar
Deepak Kesarkar : शिवसेनेला एक कोटी दिल्याचा माझ्याकडं पुरावा आहे; शिक्षणमंत्र्यांचा खळबळजनक दावा

डॉ. माशेलकर काय म्हणाले?

  • - कोल्हापुरात येणाऱ्या कंपन्यांमध्ये भागीदारी करा

  • - पारंपरिक उद्योग-व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्या

  • - वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांचे स्वरूप देखील बदलत असून ते तरुणाईने लक्षात घ्यावे

  • - आयुष्यातील सर्वोत्तम अजून मला मिळवायचंय असा विचार सातत्याने करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com